आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

28 ची असतानी 51 वर्षांच्या लेखकासोबत केले लग्न, तीन वर्षांत झाला घटस्फोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पद्मलक्ष्मी - मॉडेल

वडील- वैद्यनाथन,
आई - विजया
जन्म- १ सप्टेंबर १९७०
शिक्षण- वर्कमॅन हायस्कूल, कॅलिफोर्नियामधून पदवी, थिएटर आर्ट््समध्ये क्लार्क विद्यापीठातून पदवी.

चर्चेत- त्यांचे पहिले पुस्तक "लव्ह, लॉस अँड व्हॉट वुई अॅट'मध्ये अनेक गौप्यस्फोट.
{चेन्नईत तामिळ ब्राह्मण अय्यर कुटुंबात जन्मलेल्या पद्मलक्ष्मी दोन वर्षांच्या असताना आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. वडील फायजरमध्ये नोकरी करत होते व आई परिचारिका होती. घटस्फोटानंतर आई त्यांना अमेरिकेला घेऊन गेली.
{१४ वर्षांच्या असताना त्यांना स्टीव्हन जॉन्सन सिंड्रोम आजार जडला. औषधाच्या रिअॅक्शनमुळे त्यांना हा त्रास झाल्याने तीन आठवडे रुग्णालयात राहावे लागले. रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर अपघातात हात मोडला.
{पद्मा मुलीचे नाव कृष्णा ठेवू इच्छित होत्या. मुलीच्या नावावरून बराच वाद झाला. त्यांच्या म्हणण्यानुसार मुलीचा पिता अन्य व्यक्ती आहे. मात्र, अॅडम डेल (डेल कंपनीचे मायकेल डेल यांचे बंधू) त्यावर अडून राहिले. त्यांनी मॅनहॅटन सर्वोच्च न्यायालयात खटला भरला. डीएनए चाचणीत पद्मा खोट्या ठरल्या.
{१९९१ ची घटना. एका कॅफेमध्ये मॉडेलिंग एजंटने तिच्याकडे मॉडेलिंगचा प्रस्ताव ठेवला. महाविद्यालयीन शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याच्याही विचारात ती होती. त्यामुळे हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला. वडिलांनी मुलीच्या करिअरसाठी फाइजरची नोकरी सोडली.
{ पद्मा व लेखक सलमान रश्दी यांची भेट १९९९ मध्ये न्यूयॉर्कमध्ये ओळख झाली. तेव्हा पद्माचे वय २८ वर्षे होते व रश्दी ५१ वर्षांचे. २००४ मध्ये लग्न केले. मात्र, ३ वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला.
हॉलीवूडमध्ये १९९९ मध्ये पहिला चित्रपट आला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, पद्मा आणि लेखक रश्दींचे फोटो...