आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 हून अधिक वाहनांचा ताफा घेऊन कोर्टात पोहोचले, सुनावणीवेळी हाथ जोडून उभे होते बाबा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाबा राम रहिम यांनी कोर्टात हजेरीसाठी जाताना 400 वाहनांचा ताफा नेला. - Divya Marathi
बाबा राम रहिम यांनी कोर्टात हजेरीसाठी जाताना 400 वाहनांचा ताफा नेला.
नवी दिल्ली - गुरमीत बाबा राम रहिम यांना बलात्कार प्रकरणी दोषी ठरवताच भक्तांनी सर्वत्र धुमाकूळ घातला. पंजाब आणि हरियाणात तोडफोड आणि मारहाण करणाऱ्या भक्तांच्या हिंसाचाराचे लोण आता दिल्ली आणि यूपी पर्यंत पोहचले आहे. राजस्थानात सुद्धा हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.  केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे. यासोबतच त्यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे.  राज्यांमध्ये पसरलेल्या हिंसाचारामुळे अब्जावधींचे नुकसान झाले आहे. याची भरपाई बाबाची संपूर्ण संपत्ती जप्त करून केली जाणार आहे. पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने शुक्रवारी संध्याकाळी याबाबतचे आदेश दिले. 
 
 
कोर्टात फिल्मी स्टाईल एंट्री...
- डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा गुरमीत राम रहिम यांना 2 महिला अनुयायींच्या बलात्कार प्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. पंचकुला येथील विशेष सीबीआय कोर्टाने हा निकाल दिला. शिक्षेवरील सुनावणी 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. कोर्टातच बाबा रामरहिम यांना ताब्यात घेण्यात आले.
- सकाळी पंचकुला कोर्टात हजेरी लावण्यासाठी बाब तब्बल 100 हून अधिक वाहनांचा ताफा घेऊन निघाले होते. त्यावेळी कोर्ट परिसर एका छावणीत परिवर्तित झाले होते. मात्र, कोर्टाच्या परिसरात जाण्याची परवानगी केवळ 2 वाहनांना देण्यात आली. सिरसा आणि पंचकुला येथे चोख सुरक्षा बंदोबस्त लावण्यात आले होते. पंचकुला शहरात आधीच लष्कर तैनात कण्यात आले होते. 
- गुरमीत राम रहिम कोर्ट रूममध्ये हाथ जोडून उभे होते. कोर्टाने त्यांना दोषी ठरवताच सिरसा आणि पंचकुला येथे त्यांचे भक्त भावूक झाले. अनेक भक्त तर, भर रस्त्यावर ढसा-ढसा रडत होते. 
- दोषी ठरवल्यानंतर डेरा प्रमुखाच्या समर्थकांनी पंचकुला येथे रस्त्यांवर उतरून गाड्या पेटवण्यास सुरुवात केली. डझनांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला, तसेच शेकडो जण जखमी झाले. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे.
 
 
संपत्ती जप्त करून भरपाई
- बाबा रामरहिम यांच्या भक्तांनी केलेल्या हिंसाचाराची गंभीर दखल घेऊन पंजाब-हरियाणा हायकोर्टाने त्यांची सगळीच संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. 
- ही सगळीच संपत्ती जप्त करून ठिक-ठिकाणी झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई केली जाणार आहे. रामरहिमच्या संपत्तीचा आढावा लवकरात लवकर घेऊन ही भरपाई केली जाणार असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
- डेरा सच्चा सौदाने या निकालास अन्यायकारक म्हटले आहे. तसेच हायकोर्टाच्या आदेशाला डेरा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. 
 

सरकारला दोष देऊ नका - राजनाथ
- परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचा दावा करताना गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्य सरकारला दोष देऊ नका असे म्हटले आहे. राज्य सरकारने सुरक्षेच्या सर्व उपाय-योजना केल्या होत्या असा दावा देखील सिंह यांनी केला. यासोबतच, आपण या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली असून तातडीची आढावा बैठक सुद्धा घेतल्याचे ते पुढे म्हणाले. 
- दिल्लीतील मंगोलपुरी, ख्याला, आनंद विहार येथे भक्तांचा हिंसाचार झाला. तसेच डीटीडीसी बसेससह इतर अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत दिल्लीत चोख सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
बातम्या आणखी आहेत...