Home »National »Delhi» Home Minister Rajnathsingh Gave Speech To Ias Officer

नेत्यांची हुजरेगिरी नको, नि:पक्ष काम करा; गृहमंत्र्यांचा प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना सल्ला

वृत्तसंस्था | Apr 21, 2017, 04:42 AM IST

  • नेत्यांची हुजरेगिरी नको, नि:पक्ष काम करा; गृहमंत्र्यांचा प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना सल्ला
नवी दिल्ली - नोकरशहांनी नि:पक्ष असावे तसेच कोणताही निर्णय घेण्यात संकोच करू नये. नेत्यांनी दिलेल्या चुकीच्या आदेशाला विरोध करता फक्त हाजी हाजी करू नका, असा खोचक सल्ला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी देशातील अधिकाऱ्यांना दिला आहे. नागरी सेवा दिनाच्या उद्घाटनीय समारंभात गृहमंत्री बोलत होते. या वेळी आयएएससमवेत अन्य नागरी सेवांचे अधिकारीही उपस्थित होते.
सिंह पुढे म्हणाले, नेते चुकीचे आदेश देत असतील तर तुम्ही त्यांच्या निदर्शनास आणून द्या. त्यांच्या होकारात होकार मिसळू नका आपला स्वाभिमान गहाण ठेवू नका. नागरी सेवेत अधिकारासोबत जबाबदारी उत्तरदायित्वही असते, हे आपण विसरू नये. नोकरशाहीत नि:पक्षता नसेल तर निर्णय घेण्याची क्षमता प्रभावित होऊ शकते. निर्णय घेऊन आपण देशाला नुकसान पोहोचवत असतो. २०२२ पर्यंत सर्वांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आरोग्य सुविधा पुरवणे हे पंतप्रधानांचे स्वप्न आहे. हे स्वप्न सत्यात आणायचे आहे, हे नोकरशहांनी लक्षात ठेवावे, असेही गृहमंत्र्यांनी या वेळी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाच्या वेळेवरून कानउघाडणी
नागरीसेवा दिनाचा कार्यक्रम १२ मिनिट विलंबाने सुरू झाल्यामुळे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. ते म्हणाले, अधिकाऱ्यांचा समारंभ निश्चित वेळेवर सुरू होणे चिंतेची बाब आहे. कार्यक्रम विलंबाने सुरू होऊनही अधिकाऱ्यांचे सभागृहात आगमन सुरूच होते. हा कार्यक्रम सकाळी ९.४५ वाजता सुरू होणार होता. मी ठरलेल्या वेळेच्या मिनिट आधी पोहोचलो तरी समारंभ वाजून ५७ मिनिटांनी सुरू झाले. शिवाय अधिकारी विलंबाने येणे सुरूच होते, असेही ते या वेळी म्हणाले.

Next Article

Recommended