आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Home Minister To Visit Border Area Of China And Pakistan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तणावाच्या परिस्थितीत गृहमंत्री करणार पाक-चीन सीमा भागाचा दौरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : एनएसजी कमांडोसह राजनाथ सिंह. - Divya Marathi
फाइल फोटो : एनएसजी कमांडोसह राजनाथ सिंह.
नवी दिल्ली - पाकिस्तान आणि चीन बॉर्डरवरील तणावाच्या स्थितीतच आता गृहमंत्री राजनाथ सिंह या दोन्ही देशांच्या बॉर्डर पोस्टचा दौरा करणार आहेत. राजनाथ सिंह पुढील आठवड्यात या भागांचा दौरा करतील. पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. तर लडाखच्या परिसरातही पेट्रोलिंग लाइनवर चीनने तयार केलेले वॉच भारतीय लष्कराने पाडल्याने तणाव निर्माण झाला आहेत.

तीन दिवसांचा दौरा
राजनाथ सिंह यांचा हा तीनदिवसीय दौरा मंगळवारी सुरू होईल. सर्वात आधी ते जम्मू-काश्मीरला जातील. त्याठिकाणी ते सांबामध्ये आयटीबीपीच्या नव्या ऑफिसर्स मेसचे उद्घाटन करतील. पाकिस्तानने वारंवार ज्या पोस्टवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे, त्या पोस्टवरही राजनाथ सिंह जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर राजनाथ चुमार (लडाख) च्या सीमा भागात जातील येते गेल्यावर्षी सप्टेंबर 2014 मध्ये भारत आणि चीनमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. गृहमंत्री आयटीबीपीच्या थाकुंग आणि चुशल पोस्टवरही जातील. त्याठिकाणी ते सद्यस्थितीचा आढावा घेतील. राजनाथ येथे स्थानिक प्रशासाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन विकासकामांचीही माहिती घेतील.

लडाखमध्ये भारत चीन समोरा-समोर
लडाखमध्ये भारत आणि चीनचे सैन्य पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. लडाखच्या बुर्तसे परिसरात दोन्ही देशांमध्ये सध्या तणाव वाढला आहे. चीने पेट्रोलिंग लाइनवर तयार केलेले वॉच टॉवर भारतीय लष्कराने पाडले आहे. त्यानंतर हा तणाव िनर्माण झाला. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये मोठी वाढ दिसून येत आहे.

प्रकरण काय..
चिनी लष्कराने पेट्रोलिंग लाइन (ज्याच्या आत राहून गस्त घातला जातो)च्या जवल एक वॉच टॉवर तयार केले होते. शुक्रवारी भारतीय लष्कर आणि इडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसांनी एकत्रितपणे ते टॉवर उडवले. त्यानंतर दोन्ही बाजुंच्या सैन्यामध्ये वाढ होत आहेत.