आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येत्या 15 वर्षात सर्वांना घर, वाहन आणि एसी सुद्धा..नीती आयोगाचे व्हिजन वास्तवात येईल का?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- येत्या १५ वर्षांत प्रत्येक भारतीयाला घर, शौचालय, दुचाकी वा चारचाकी वाहन, वीज, एअर कंडिशनर आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी मिळेल. तसेच सन २०३१-३२ पर्यंत दरडोई उत्पन्नात वाढ करून ते ३.१४ लाख रुपये प्रतिव्यक्तीपर्यंत नेण्याची नीती आयोगाची योजना आहे. आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी व्हिजन २०३१-३२ नावाचा एक अहवाल तयार केला आहे. तो रविवारी आयोगाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत केंद्रीय कॅबिनेट आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आला. 
 
या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये साक्षर समाज आणि सर्वांसाठी आरोग्य सेवेची योजना आखण्यात आली आहे. तसेच विस्तृत रस्त्यांचे जाळे, रेल्वे, जलमार्ग आणि विमानमार्गांच्या कनेक्टिव्हिटीचीही योजना त्यात आहे. याशिवाय देशाचे दरडोई उत्पन्न २०३१-३२ पर्यंत ३.१४ लाख रुपयांवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. ते २०१५-१६ मध्ये १.०६ लाख रुपये होते.
बातम्या आणखी आहेत...