आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HoneyMoon Express: फक्त 5000 रुपयात करा हेरिटेज ट्रॅकवर रोमान्सपूर्ण प्रवास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिमला - लग्नाचा सिझन आता लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे लग्नाची ही आठवण अधिक अविस्मरणीय बनवण्यासाठी नवविवाहीत जोडप्यांना एक चांगली भेट भारतीय रेल्वे कडून देण्यात येत आहे. ही भेट अशी आहे की, नवीन जोडपे नेहमी याबद्दलच्या कल्पना आपल्या मनात रंगवत असते. नवविवाहित जोडप्यांसाठी उत्तर रेल्वे शिमला-कालका हेरिटेज ट्रॅकवर हनिमून स्पेशल ट्रेन सुरू करणार आहे. अत्यंत रोमांचक अशा या सफरीवर न्यू कपल रोमांसचा आनंद पूरेपूर लुटू शकतात. या प्रवासादरम्यान कोणी कपल्सला डिस्टर्बही करणार नाही याची गॅरंटी रेल्वेने आपल्या पॅकेजमध्ये दिली आहे. यासाठी न्यू कलपला केवळ 5000 रुपये खर्च करावे लागतील. या नव्या सफरीची सुरूवात याच महिन्यापासून होणार आहे.
कालका-शिमला वर्ल्ड हेरिटेज ट्रॅक असेही जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. हा ट्रॅकवरील प्रवास उन्हाळ्यात अधीक रोमांचक असतो. देवदारने भरलेल्या दऱ्या डोंगरांमधून 96 किमीच्या या सफरीत 102 बोगदे आणि 87 पुलांवरून ही रेल्वे शिमलाला पोहोचते. हनीमुन स्पेशल याला अधिक अविस्मरणीय बनवणार आहे. यावेळी या रेल्वेच्या बोगींमधील इंटेरियर बदलण्यात आले आहे. हे इंटेरिअर अत्यंत रोमांटीक पध्दतीने सजवण्यात आले आहे. ई-मेल ची औपचारीकता पुर्ण करताच तुमच्या प्रवासाविषयीची माहिती तुम्हाला देण्यात येईल. ही कोच कालकावरून सकाळी 8.30 वाजता शिमासाठी जाणाऱ्या शिवालिक क्वीनला जोडली जाईल. ही सेवा तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती. तेव्हा 7000 रुपये प्रवास भाडे असल्याने तसेच कपल्सचा अल्प प्रतिसाद यामुळे बंद करण्यात आली होती.

खालील पत्त्यावर करा ई-मेल
नवविवाहिकतांसाठी हनीमुन कोच बुक करण्यासाठी जास्त धावपळ करण्याची गरज नाही. यासाठी तुम्हाला घर बसल्या रेल्वे विभागाला pamcell.umb@gmail.com या पत्त्यावर एक ईमेल करायचा आहे. तुमची विनंती संबंधीत अधिकाऱ्यापर्यंत पोहोचेल. आणि पुढील प्रक्रियेला सुरूवात होईल.
या असतील सुविधा
हनिमून कोचला अत्यंत आरामदायक सीट सोबतच स्लीपरचीही सोय करण्यात आली आहे. याशिवाय, मोबाईल चार्जिंग, जेवण यासाठीही वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रवास सुरू होण्याआधीच तुम्हाला सर्व काही खाण्यापिण्यापासून गरजेचे सर्व सामान देण्यात येईल. यामुळे प्रवास सुरू झाल्यानंतर तुमचा एकांत कोणीही बंग करणार नाही. तसेच स्टेशनवर तुम्ही तुमच्या मर्जीनुसार सामानही घेऊ शकता.


पुढील स्लाईडवर पाहा, या रोमांसपूर्ण रोमांचक सफरीचे इतर PHOTOS