Home | National | Delhi | Honeypreet Present In Punchkula Court And Police Police Got To 3 Days Remand

माझ्या इशाऱ्यावर पंचकुलामध्ये दंगल, सव्वा कोटी रुपये वाटले: हनीप्रीतची कबुली

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 11, 2017, 03:26 PM IST

व्हिडिओमध्ये देशविरोधी घोषणा होत्या. बाबाला शिक्षा झाली तर जगाच्या नकाशातून भारताला मिटवून टाकू.'

 • Honeypreet Present In Punchkula Court And Police Police Got To 3 Days Remand
  हनीप्रीतला 3 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
  पंचकुला - पोलिस कोठडीत असलेल्या हनीप्रीतने पंचकुला दंगल तिच्या इशाऱ्यावर झाल्याचे कबुल केले आहे. एसआयटीने म्हटल्यानुसार, हनीप्रीतने सांगितले, की हिंसाचार भडकवण्यासाठी तिने सव्वा कोटी रुपयांचे वाटप केले होते. साध्वी बलात्कार प्रकरणी 20 वर्षांची शिक्षा झालेल्या राम रहिमची विश्वासू साथीदार हनीप्रीत इन्सा 6 दिवस पोलिस कोठडीत होती. मंगळवारी तिला आणखी तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. पोलिस कोर्टात म्हणाले की ती तपासात सहकार्य करत नाही. विशेष तपास पथकाने म्हटले, 'हनीप्रीतने देशविरोधी व्हिडिओ तयार करुन तो व्हायरल केला होता. या व्हिडिओमध्ये देशविरोधी घोषणा होत्या. बाबाला शिक्षा झाली तर जगाच्या नकाशातून भारताला मिटवून टाकू.'
  - एसआयटीने म्हटले, व्हिडिओ व्हायरल केल्याचे पुरावे हनीप्रीतच्या मोबाइलमध्ये आहे. हा मोबाइल सुखदीप कौरचे बिजनौरमधील नातेवाईकाच्या घरी आहे. पंचकुलामध्ये कुठे दंगल घडवून आणायची हे हनीप्रीतच्या लॅपटॉपमधील नकाशावर मार्क करण्यात आले होते. तिचा मोबाइल आणि लॅपटॉप अजून पथकाच्या ताब्यात आलेला नाही. तो मिळवायचा आहे.
  - एसआयटीने सांगितले, की मोबाइल आणि लॅपटॉप डेराच्या सिरसा येथील आश्रमात लपवून ठेवण्यात आला आहे.
  - दुसरीकडे, अद्याप फरार असलेले पवन इन्सा, आदित्य इन्सा आणि गोबीराम यांचे ठिकाणे तिला माहित आहे. तिच्या माहितीवरुनच त्यांना पकडता येईल. त्यासाठी तिला 9 दिवसांची कोठडी द्यावी.
  काळ्या पैशाचा वापर करून घडवली दंगल
  आपण 17 ऑगस्टच्या बैठकीत सहभागी होतो. पंचकुला येथील हिंसाचारात काळ्या पैशाचा वापर करण्यात आला. त्याला हा पैसा पांढरा करण्याची जबाबदारी देण्यात आली होती, अशी माहिती डेराप्रमुखाचा पीए राकेश याने पोलिसांना दिली.

 • Honeypreet Present In Punchkula Court And Police Police Got To 3 Days Remand
  कोर्टात नेले जात असताना हनीप्रीत
 • Honeypreet Present In Punchkula Court And Police Police Got To 3 Days Remand
  कोर्टात नेले जात असताना सुखदीप कौरची चप्पल बाहेर राहिली, मीडिया फोटोग्राफरने हनीप्रीतची चप्पल समजून त्याचे फोटो घेतले.

Trending