आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Honkong Super Series Badminton : This Is Finall Chance To Saina

हाँगकाँग सुपर सिरीज बॅडमिंटन: या सत्रात सायनाला अखेरची संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - हाँगकाँग सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेतून सायना नेहवालला यंदाच्या सत्रात पहिला किताब जिंकण्याची अखेरची संधी आहे. तिला या सत्रात अद्याप एकाही स्पर्धेचे अजिंक्यपद जिंकता आले नाही. आता हाँगकाँग येथील स्पर्धेत विजेतेपदाचा दुष्काळ दूर करण्याची संधी सायनाकडे आहे.
हाँगकॉँग येथे 19 ते 24 नोव्हेंबरदरम्यान ही बॅडमिंटन स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील कांस्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूदेखील महिला एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
लंडन ऑलिम्पिक पदक विजेत्या सायनाला सातवे मानांकन मिळाले आहे. स्पर्धेतील ड्रॉ देखील तिच्यासाठी सोपा आहे. महिला एकेरीच्या सलामी सामन्यात सायनाची गाठ इंडोनेशियाच्या बेलेट्रिक्स-मेनपुलीशी पडणार आहे. ही लढत बुधवारी होईल. त्यानंतर दुसर्‍या फेरीत भारताच्या खेळाडूसमोर थायलंडच्या पोर्नटिप किंवा जपानच्या एरिको हिरोसेचे आव्हान असेल. या दोन्ही फेरीतील विजयानंतर सायनाला उपांत्यपूर्व लढतीत लंडन ऑलिम्पिक चॅम्पियन झुईरुई लीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
सहभागी भारतीय खेळाडू
सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, पी. कश्यप, अजय जयराम, आनंद पवार, ज्वाला गुट्टा, अश्विनी पोनप्पा, तरुण कोना, प्रणव चोपडा, अक्षय देवालकर.
हाँगकाँग सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धा आजपासून, सिंधूचा सहभाग