आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • House Workers Give 15 Days Paid Leave And Nine Thousand Monthly Salary

घरगडी, मोलकरणींना 15 दिवस पगारी सुटी, नऊ हजारांपर्यंत पगार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आता लवकरच पूर्णवेळ घरगडी वा मोलकरणींसारख्या कामगारांना दरमहा किमान ९ हजार रुपये पगार, वर्षातून १५ दिवस पगारी सुटी आणि प्रसूती रजाही मिळू शकेल. घरगुती कामगारांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारच्या प्रस्तावित राष्ट्रीय धोरणात या तरतुदींचा समावेश आहे.
योजनेचा मसुदा कॅबिनेटपुढे सादर केला जाईल. त्यात घरगुती कामगारांना सामाजिक सुरक्षा, लैंगिक शोषण, वेठबिगारीविरुद्ध संरक्षण, शिक्षणास मदत आदी तरतुदी आहेत. धोरणात अकुशल, अर्धकुशल व कुशल अशा कामगारांच्या तीन श्रेणी निश्चित होतील. कुशल व पूर्णवेळ कामगारांना दरमहा ९ हजार रुपये वेतन द्यावे लागेल. कामगारांना आपली संघटना उभारणे व वेतनवाढीसाठी सामूहिक वाटाघाटींचेही अधिकार असतील.