आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज बँक, 2 दिवस ATM बंद, 10 नोव्हेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान बँक व पोस्टात बदलून घ्या ५००-१००० च्या नोटा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोदी सरकारने एकदम आश्चर्यचकित करणारा निर्णय घेत देशात ५०० व १००० रुपयांच्या नोटा बंद केल्या. निर्णय मंगळवारी मध्यरात्रीपासूनच लागू झाला. त्याची माहिती स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशात दिली. ते म्हणाले की, लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. ११ नोव्हेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत ५०० व १००० रुपयांच्या नोटा बँका व पोस्ट ऑफिसमध्ये जमा करता येतील. या जुन्या नोटांच्या बदल्यात सरकार ५०० व २००० रुपयांच्या नव्या नोटा आणत आहे. त्या ११ नोव्हेंबरपासून मिळतील. बँका व एटीएममध्ये नोटा बदलणे सुलभ व्हावे म्हणून ९ व १० नोव्हेंबरला एटीएम बंद राहतील. बुधवारी बँकाही बंद राहतील. मात्र, चेक, ड्राफ्ट किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे पूर्वीप्रमाणेच व्यवहार होतील. निर्णयाचा हेतू सांगताना ते म्हणाले की, शेजारी देशाने मोठ्या प्रमाणात बनावट नोटा भारतात पाठवल्या आहेत. शिवाय लोकांनी मोठ्या प्रमाणावर काळा पैसाही साठवला आहे. तो बाहेर काढण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे लोकांना थोडा त्रास होईल. मात्र हीसुद्धा एक देशभक्तीच आहे.

दुसऱ्याचे पैसे बदलू नका : आरबीआयचे स्पष्टीकरण
आरबीआयने म्हटले आहे की, काहीजण तुमच्या अजाणतेपणाचा फायदा घेत त्यांच्या ५०० व १००० रुपयाच्या नोटा बँकेतून बदलून आणायला सांगू शकतात. तुम्ही तसे अजिबात करू नका. कारण तुम्ही जमा करत असलेल्या नोटांवर पूर्णत: निगराणी ठेवली जाईल. त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही होईल. शिवाय पूर्ण माहितीही ठेवली जाईल. तुमची एक चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहिलेलेच बरे. लोकांची अडचण होऊ नये म्हणून बँकांना जास्तीचे काउंटर उघडण्याचे आणि जास्त वेळ काम करण्याचे निर्देश दिले आहेत. १००० रुपयाच्या नव्या नोटाही जारी होतील.

मोदींचा पुन्हा धक्का
एवढ्या मोठ्या घोषणेची भनकही कोणाला लागली नाही. मोदी दिवसभर लष्करप्रमुखांशी चर्चा करत राहिले. नंतर ते राष्ट्रपतींच्या भेटीला जाणार असल्याची बातमी आली. सायंकाळी ते राष्ट्राला उद्देशून संदेश देणार असल्याची बातमी आली. कदाचित पाकिस्तानबाबत मोठी घोषणा केली जाईल, अशी चर्चा मीडियात सुरू झाली. मात्र मोदींनी नोटा रद्द करण्याची घोषणा करून सर्वांनाच धक्का दिला. यापूर्वी पाकला जाऊन नंतर स्मृती इराणींचे पद कमी करून असाच धक्का दिला होता.

३८ वर्षांनंतर पुन्हा बंद झाल्या नोटा, तेव्हाही गुजराती पंतप्रधान
३८ वर्षांनंतर सरकारने असे पाऊल उचलले. यापूर्वी गुजरातेत जन्मलेले पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी १९७८ मध्ये १००० च्या नोटा बंद केल्या होत्या. त्यावेळी लोकांनी हजार रुपयांच्या नोटा रद्दीत फेकून दिल्या होत्या. अनेकांनी चिलीम म्हणून त्याचा वापर केला होता. विशेष म्हणजे तेव्हा आय. जी. पटेल आरबीआयचे गव्हर्नर होते. आता ऊर्जित पटेल आहेत.
पुढील स्लाईडवर वाचा, नोटेशी संबंधित प्रत्येक बाब तुम्ही समजून घेणे नोट करणे आवश्यक...
बातम्या आणखी आहेत...