आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आप सरकारच्या टीव्ही जाहिरातीवरून वादंग; नियमांचे उल्लंघन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सरकारचा महिमा सांगणाऱ्या टीव्ही जाहिरातींवरून वादंग निर्माण झाले आहे. भाजप आणि काँग्रेसने त्यावर प्रश्नचिन्ह लावले आहे. त्याचबरोबर दिल्ली महिला आयोगानेदेखील ही जाहिरात महिलांचा अपमान करत असल्याचे म्हटले आहे. आपची जाहिरात सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वाचे उल्लंघन करणाऱ्या आहेत.

जाहिराती तत्काळ बंद कराव्यात, तसे न झाल्यास पक्ष सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावेल, असा इशारा भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी शनिवारी दिला. केजरीवाल यांच्याकडे सफाई कामगारांना देण्यासाठी पैसे नाहीत, मग सरकारच्या जाहिरातींवर कोट्यवधींचा खर्च सरकारला पेलवतो तरी कसा, असा सवाल भाजपने केला.