आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • How India And Indians Will Get Affacted By Iraq Crisis

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आपबीती : मृतदेहाखाली लपून वाचवला जीव, इराकहून परतलेल्या भारतीयांचे अनुभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली -
आपबीती : मृतदेहाखाली लपून वाचवला जीव, इराहून परतलेल्या भारतीयांची कहानी
संकटाने ओढावलेल्या इराकच्या कर्बला आणि नजफ या धार्मिक स्थळांहून परतलेल्या भारतीय मुस्लीमांनी आपबीतीचे कथन केले आहे. साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतल्याने या भावीकांनी म्हटले आहे. बंदी बनवण्यासाठी जेव्हा दहशतवादी नागरिकांचा शोध घेत होते, त्यावेळी स्वतःचा जीव वाचावा म्हणून मृत इराकी नागरिकांच्या मृतदेहाखाली लवल्याचा भयावह अनुभव या भावीकांनी व्यक्त केला आहे.

किशोरवयीन मुलांनाही सोडले नाही
इराकहून परतलेले जफर हसन नक्वी त्यांच्या पत्नी अंदालीब आणि मुलगी एमा यांची इराकमधील दृश्यांनी अक्षरशः झोप उडवली आहे. दहशतवादी महिलांचीही अत्यंत क्रूरपणे हत्या करत असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर त्यांनी किशोरवयीन मुलांनाही सोडले नाही, असे नक्वी म्हणाले. जो कोणी त्यांना दिसेल त्याची ते हत्या करत होते, अशा शब्दांत त्यांनी वर्णन केले. वेळेवरप सुरक्षारक्षक पोहोचल्यामुळेच जीव वाचवता आल्याचे जफर म्हणाले. काही भावीकांनी तर जीव वाचवण्यासाटी स्वतःला मृतदेहांखाली लपवल्याचेही त्यांनी सांगितले.
इस्लामिक स्टेट इन इराक अँड अल-शाम (आयएसआयएस) च्या दहशतवाद्यांमुळे निर्माण झालेल्या इराक संकटचे दूरगामी आणि व्यापक परिमाण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराक संकटामुळे ज्यावर सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ती म्हणजे कच्च्या तेलाचा पुरवठा. त्याचे ठोस कारणही आहे. जगभरात तेलाची निर्याची करणा-या 12 देशांच्या ओपेक या संघटनेमध्ये इराक सध्या दुस-या क्रमांकावर आहे. तेलाबरोबरच दक्षिण आशियाच्या राजकीय आणि प्रशासकीय परिस्थितीबरोबरच दहशतवा द्यांचा वाढता प्रभाव हेही सर्वांच्या चिंतेचे कारण आहे.

इराक संकटाचा परिणाम?

डिझेलपाच रुपयांनी महागणार
इराकमधील हे युद्ध असेच सुरू राहिले आणि कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ होत राहिली तर, डिझेलचे दर वाढणे हे निश्चित आहे. सध्या भारत 111.25 डॉलर प्रती बॅरल दराने कच्च्या तेलाची खरेदी करतो. आयात शुल्‍काचा विचार करता भारताला त्यासाठी प्रति बॅरल 6,688 रुपये मोजावे लागतात. त्यामुळे जर कच्च्या तेलाचे दर 120 डॉलर प्रती बॅरलवर गेले तर भारताला त्यासाठी 7,200 रुपये मोजावे लागतील. पण यासंदर्भात नक्की अंदाज बांधणे मात्र कठीण आहे. पण जर कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 120 डॉलर प्रती बॅरलवर गेले तचर डिझेसच्या दरामध्ये 5 रुपये प्रतिलीटर वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शुक्रवारी आंतरराष्‍ट्रीय बाजारात कच्‍च्या तेलाचे दर 115 डॉलर प्रति बैरलवर पोहोचले होते.
पुढील स्लाइड्सवर वाचा आणखी कशावर काय परिणाम होणार?