आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • How India Got Its Boundaries? Maps Offer Historical Insights

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वातंत्र्यपूर्व भारताचे जुने नकाशे तयार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - स्वातंत्र्यपूर्व काळातील भारताचा भूप्रदेश व त्यानंतर देशाला मिळालेली सरहद्द यावर प्रकाश टाकणारे नकाशे जाहीर झाले आहेत. नकाशातून इतिहास आणि भूगोलाचा फेरफटका मारण्याची संधी राजधानीतील एका प्रदर्शनातून मिळणार आहे.

स्वातंत्र्य दिन (15 ऑगस्ट) ते 20 सप्टेंबर या काळात राजधानीत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 18 व्या शतकातील नकाशातून ही माहिती पुढे आली आहे. पाश्चात्त्य जगातील आघाडीच्या नकाशाकारांनी काही नकाशे तयार केले आहेत. पिअर मॉर्टिअर लॅपी, रिगॉबोर्ट बॉन, टॅलिस अशी तत्कालीन प्रसिद्ध नकाशाकारांची नावे आहेत. 1750 च्या अगोदरच्या कालखंडातील हे नकाशे आहेत. अर्थात सुमारे दोनशे वर्षांपूर्वी भारत कसा दिसत होता, याची उत्सुकता असणार्‍यांसाठी हे प्रदर्शन अतिशय फायदेशीर आहे. मोगल कालखंडातील भारताची रचना यातून पुढे येते. त्याचबरोबर नंतर ब्रिटिश काळात अखंड भारत कसा होता, हे देखील जाणून घेता येऊ शकते. आम्ही विविध नकाशे एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे, असे अनुभव नाथ यांनी सांगितले.

छपाई कोठे ?
भारत उपखंडाची माहिती देणार्‍या प्राचीन नकाशाची छपाई इंग्लंड, फ्रान्स, इटली व अमेरिकेत करण्यात आली होती. पॅरिसमधील सी. एच. लॅकोस्ट प्रकाशकाने छपाई केलेल्या नकाशाचे शीर्षक ‘इंडोस्टान, प्रिस्किल्स ऑफ इंडिया, चायना, इंडिपेंडंट टार्टी ’ असे आहे. 1829 मधील पहिल्या आवृत्तीत र्शीलंका, अफगाणिस्तान, भूतान, नेपाळ, मलेशिया, थायलंड, बर्मा, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया या देशांचा समावेश आहे.

संकल्पना कोणाची ?
इतिहासाची आवड असणारे अनुभव नाथ यांच्या वैयक्तिक संग्रहात बरेच प्राचीन नकाशे आहेत. त्यांनी तर काही नकाशे त्यांचे आजोबा रामचंद्र नाथ यांनी जतन करून ठेवले होते.