आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Knowledge: कसा तयार होतो कायदा, जाणून घ्या सविस्तर माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्र सरकारचे भूमी अधिग्रहण विधेयक संसदीय पेचात अडकले आहे. सरकार यावर तिसऱ्यांदा अध्यादेश आणण्याच्या तयारीमध्ये आहे. जाणून घेऊया संसदेत एखादा कायदा कसा तयार होतो आणि यासाठी किती अडथळे पार करावे लागतात, या सर्वांची माहिती देत आहेत आमचे तज्ज्ञ दिल्ली युनिव्हर्सिटीचे प्रोफेस डॉ. निरंजन कुमार...

काय असते विधेयक?
साधारणपणेअसे म्हटले जाते की, संसद कायदा तयार करते. मात्र, वास्तवात याची सुरुवात कार्यपालिका किंवा सरकारद्वारे होते. सरकारला जर एखादा कायदा बनवायचा असेल तर सर्वप्रथम ते एक प्रस्ताव आणतात. हा प्रस्ताव एका ड्राफ्टच्या रूपात असतो. नंतर तो एका मसुद्याच्या रूपात तयार करून संसदेच्या पटलावर ठेवला जातो आणि तेव्हा याला विधेयक म्हणतात. इंग्रजीमध्ये याला बिल म्हटले जाते. ते संसदेच्या दोन्ही (लोकसभा आणि राज्यसभा) सभागृहांमध्ये पारित करणे आवश्यक असते. हे विधेयक आधी कोणत्याही सभागृहात ठेवता येते. साधारणत: ते लोकसभेमध्ये आधी सादर केले जाते.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, कायदा तयार होण्याची संपूर्ण पध्दती...