आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • How To Sustain Civil Service Prestige?, Civil Officers Ask Uttar Pradesh Government

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सनदी सेवेची प्रतिष्ठा कशी राखाल ?, सनदी अधिका-यांचा उत्तर प्रदेश शासकांना प्रश्‍न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या तरुण आयएएस दुर्गाशक्ती नागपाल यांच्या निलंबनाचा वाद पेटला आहे. बदली करून अधिका-यांना झुकवू शकतो, असा राजकारण्यांचा समज झाला आहे. त्यामुळे सनदी सेवेची प्रतिष्ठा कशी राखली जाईल का, असा सवाल आजी-माजी सनदी अधिका-यांनी उपस्थित केला.


एका मशिदीची संरक्षक भिंत पाडण्याचा आदेश बजावल्याच्या आरोपावरून 28 वर्षीय नागपाल यांना 27 जुलै रोजी निलंबित केले होते. मशिदीची संरक्षक भिंत पाडण्याच्या आदेशामुळे नव्हे, तर वाळूतस्कर व भूमाफियांविरुद्धच्या कडक कारवाईमुळे त्यांचे निलंबन झाल्याचे अनेक अधिका-यांचे म्हणणे आहे. सनदी सेवेमध्ये सुधारणा करण्यासाठी अधिका-यांच्या अनावश्यक बदल्या व निलंबन करणे योग्य नाही, असा अधिका-यांचा सूर आहे. आपल्या कारकीर्दीमध्ये अनेक अहवालांवरून टीकेचे लक्ष्य ठरलेले निवृत्त महालेखापाल विनोद राय यांनी नागपाल यांना पाठिंबा दिला आहे.


नागपाल यांचे निलंबन सत्तेसाठी रचलेला खेळ आहे. माझ्या दृष्टीने ते अयोग्य आहे. फार कमी अधिकारी अपप्रवृत्तीला आळा घालण्यासाठी धैर्य दाखवतात.’
अशोक खेमका, आयएएस, हरियाणा केडर
(काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्यावर कारवाई केल्यामुळे चर्चेत)