आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • HRD Minister Smriti Irani In A War Of Words With Scribe On Twitter

शिफारशीवरून घसरल्या; इराणींचे ट्विटर पत्रकाराशी वॉर सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय विद्यालयात हजारो शिफारशी केल्याचा दावा करणारे वृत्त मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांना चांगलेच झोंबले. म्हणूनच त्यांनी सोमवारी एका अर्थविषयक दैनिकाच्या पत्रकाराशी ट्विटरवरून जाहीर वाकयुद्ध छेडले होते.

केंद्रीय विद्यालयात सुमारे ५ हजार विद्यार्थांना प्रवेश मिळावा यासाठी इराणींनी शिफारशी केल्या होत्या. अशा आशयाची बातमी झळकल्यानंतर इराणींनी ट्विटरवरून त्याचे स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली. बातमी पूर्णपणे वास्तवापासून दूर जाणारी आहे. त्यात कल्पित गोष्टी मांडण्यात आल्या आहेत, असे इराणींनी ठासून सांगितले. त्यावर पत्रकाराने विभागाच्या अधिकाऱ्याचा हवाला दिला. त्यावर दोन आेळी आमच्या आणि बाकीचे व्हर्जन तुमचे अाहे, अशा शब्दांत इराणी यांनी संताप व्यक्त केला. प्रवेशाच्या वेळी अध्यक्ष या नात्याने मी सर्व प्रकारची प्रक्रिया पूर्ण केली. परंतु माझ्या विरोधात असा अजेंडा राबवण्याची पत्रकाराची ही दुसरी वेळ असल्याचा घणाघातही इराणींनी केला. मंत्रिमहोदय आणि पत्रकार यांच्यात ट्विटरवरून बराच वेळ तू तू-मैं मैं सुरूच होते.