आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Human Resource Ministries Neglected Sonia Gandhis Advice

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोनिया गांधींचे निर्देश, तरीही समिती स्थापनेसाठी महिना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- यूपीए आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी निर्देश दिल्यानंतरही मध्यान्ह भोजन योजनेचा दर्जा सुधारण्यासाठी आणि वाढवण्यासाठी समिती स्थापन करण्यास मनुष्यबळ विकास मंत्रालयास महिनाभराचा कालावधी लागला आहे. महत्प्रयासानंतर 31 सदस्यांची समिती स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली असून ही समिती मध्यान्ह भोजन योजनेची सुरक्षा आणि दर्जा वाढवण्याबाबत उपाययोजना सुचविणार आहे.

सारण (बिहार) येथे मध्यान्ह भोजनातून झालेल्या विषबाधेने 22 शाळकरी मुलांचा मृत्यू झाला होता. त्याची गंभीर दखल घेत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उपाययोजनेसाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश सरकारला दिले होते. या आदेशाच्या महिनाभरानंतर मनुष्यबळ विकास मंत्रालयास समिती स्थापन करण्यास वेळ मिळाला आहे. यात आंध्र प्रदेश, बिहार, राजस्थान व मेघालयातील शिक्षणमंत्री सदस्य आहेत. राष्‍ट्रीय सल्लागार समितीचे सदस्य एन. सी. सक्सेना, माजी सदस्य ज्यां द्रेज यांच्यासह अनेक दिग्गजांचा यात समावेश आहे. अक्षय पात्रा, नांदी फाउंडेशनसह अनेक सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी या समितीचे सदस्य आहेत. ही समिती केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी दाखवून उपाय सुचविणार आहे. समिती स्थायी असून सदस्य कालांतराने बदलतील. दर तीन महिन्यांनी तिची बैठक होईल.