आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवी ढाल केलेल्या डार यास 10 लाख रुपये द्यावे, J&K मानवी हक्क आयोगाची शिफारस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी जवानांनी  दगडफेक्यांचा प्रतिकार करण्यासाठी तरुणाला जीपला बांधून मानवी ढाल केल्या प्रकरणात मानवी हक्क अायोगाने राज्य सरकारला नुकसानभरपाईचे आदेश दिले आहेत. फारुक अहमद डार नामक या तरुणास राज्य सरकारने १० लाख रुपये देण्याची शिफारस आयोगाने केली आहे.
 
आयोगानुसार, डार याला हे पैसे अपमान, शारीरिक छळ, तणाव, कैद व क्रौय सहन केल्याबद्दल दिले पाहिजे. राज्य मानवी हक्क आयोगाचे प्रमुख निवृत्त न्या. बिलाल नाजकी यांच्यानुसार, डारला अत्याचार व अपमान सहन करावा लागला यात दुमत नाही. त्याला आयुष्यभर या तणावात राहावे लागू शकते. तसेच राज्य सरकार सुरक्षा व्यवस्थेत केंद्रीय दलांची मदत घेतले असले तरी नागरिकांच्या हक्काच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावरच आहे.आयोगाने येत्या सहा आठवड्यांत राज्य सरकारला निर्देशाचे पालन करण्यास सांगितले आहे. ही शिफारस असून त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारची मंजुरी आवश्यक आहे. राज्याचे मुख्य सचिव सहा आठवड्यांत अहवाल सादर करतील.
 
एहसान अंतू यांच्या याचिकेवर आयोगाने हे निर्देश दिले आहेत. आयोगानुसार , लष्कराचा मानवी हक्क अधिनियम १९९३ पूर्णपणे वेगळा असल्यामुळे या प्रकरणात लष्कराला निर्देश दिले जाऊ शकत नाहीत. यामुळे आयोगाचा नाइलाज आहे.

उमर अब्दुल्लांनी केले होते ट्विट
- माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांनी फोटो ट्विट करत त्यासोबत लिहिले होते, 'या तरुणाला जीपसमोर बांधण्यात आले आहे, जेणेकरुन आर्मीवर कोणी दगडफेक करु नये. हे चित्र भयावह आहे.' या घटनेचा व्हिडिओ देखिल व्हायरल झाला होता.
- 9 एप्रिल रोजी श्रीनगरमध्ये लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली होती. त्यावेळी काही मतदान केंद्रावर हिंसाचार उसळला होता. आर्मीचा ताफा जात असताना त्यांच्यावर कोणी दगडफेक करु नये म्हणून त्यांनी एका युवकाला जीपच्या बोनेटला बांधले होते. ही जीप सर्वात पुढे होती.
- हिंसाचाराच्या घटनेमुळे 38 मतदान केंद्रांवर 13 एप्रिल रोजी पुन्हा मतदान घेण्यात आले होते.
- आर्मीने तरुणाला जीपच्या बोनेटला बांधून दगडफेक आणि हिंसाचारापासून वाचण्यासाठी त्याचा ढालीसारखा उपयोग केल्याचे म्हटले होते.
बातम्या आणखी आहेत...