आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोगलांचा भारतातील पहिला मकबरा, यासाठी विदेशातून आणले आर्किटेक्‍ट, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
19 ते 25 नोव्‍हेंबर जागतीक वारसा दिवस म्‍हणून जगभर साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने आज आम्‍ही तुम्‍हाला भारतीय इतिहासातील काही महत्त्वाच्‍या वास्‍तूंची माहिती देणार आहोत. भारत देशात असे अनेक गड-किल्ले, राजवाडे, मकबरा, महाल आहेत, यांना जागतिक महत्त्व प्राप्‍त झाले आहे. याविषयी आज आम्‍ही तुम्‍हाला हुमायूंच्‍या काळात बांधलेल्‍या मकब-याविषयी माहिती देणार आहोत.
दिल्लीमध्‍ये अनेक शतके मोगलांचे वर्चस्‍व राहिले आहे. या काळात मोगलांनी निर्माण केलेल्‍या मकब-यापैकी सर्वात जूना मकबरा म्‍हणून दिल्‍लीचा हुमायूं ओळखला जातो. हा मकबरा तयार करण्‍यासाठी विदेशातून आर्किटेक्‍ट बोलवण्‍यात आले होते. हूमायूंची पत्‍नी हमीदा बानो बेगमची इच्‍छेखातर आर्किटेक्‍ट मीरक मिर्जा गियाथने या मकब-याची निर्मिती केली होती. या मकब-याच्‍या चोही बाजूनी बाग तयार करण्‍यासाठी पारसी कला वापरण्‍यात आली आहे. हूमायूं आणि मोगल साम्राज्‍यातील अनेक मान्‍यवरांच्‍या कबरी या मकब-यात बांधण्‍यात आलेल्‍या आहेत.
मकब-याची निर्मिती हुमायूंच्‍या मृत्‍यू नंतर 9 वर्षाने 1565 मध्‍ये करण्‍यात आली. 20 जानेवारी 1556 हुमायूंचा मृत्‍यू झाल्‍यांनतर लगेच या मकब-याच्‍या कामाला सुरूवात करण्‍यात आली. 9 वर्षे या मकब-याचे काम सुरू होते. यासाठी 15 लाख रूपये खर्च लागला. मकबरा तयार करण्‍यासाठी अफगानिस्‍तान, अज्बेकिस्‍तान आणि भार च्‍या आक्रिटेक्‍ट आनले होता. 30 एकर परिसराता तयार करण्‍यात आलेल्‍या या मकब-यात अनेक मोगलांच्‍या कबरी आहेत. मात्र हूमायूंचे स्‍मारक या मकब-याचे वैशिष्‍ट्ये आहे. याशिवाय हमीदा बानो आणि शहाजहांचा जेष्‍ठ मुलगा दारा शिकोहची कबर आहे. मोगला काळातील पहिला मकबरा म्‍हणून आजही या मकब-याला विशेष महत्त्व प्राप्‍त झालेले आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा मकब-याची छायाचित्रे...