पिरियड्स हा मुलींचा अत्यंत खासगी विषय समजला जातो. पण युट्यूबवरील Old Delhi Films या चॅनेलने त्यावर तरुणाईच्या फारच रंजक रिअॅक्शन्स घेतलेल्या आहेत. त्यात काही मुलींचाही समावेश आहे. अगदी अनपेक्षितपणे विचारलेल्या या प्रश्नावर प्रारंभी मुली दचकल्याच. त्यानंतर मनमोकळी उत्तरे दिली. यावेळी मुलेही काही मागे नव्हती. त्यांनीही
आपल्या भावना बोलून दाखवल्या.
हे पॅकेज तयार करण्यासाठी या चॅनलच्या रिपोर्टरने मुलींना माहित असलेला विषय जरा बदलून घेतला. मुलांना पिरियड्स आले तर... अशी कल्पनेची फोडणी दिली. त्यामुळे विषयाला गांभिर्यासह हलका-फुलका विनोदही जोडला गेला.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, Old Delhi Films ने तयार केलेला रंजक व्हिडिओ...