आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Hung Assembly Once Again For Delhi; AAP 35 Seats, BJP 29: Survey

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धुमशान : भाजपला दिल्ली दूरच; मते 5 टक्क्यांनी घटली, संघानेही दिली कबुली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीत भाजपची स्थिती चांगली नाही. मतदारसंघातून आलेल्या निगेटिव्ह रिपोर्टिंगमुळेच पक्षाने किरण बेदींना मैदानात उतरवल्याचे सांगण्यात येते. मुख्यमंत्रिपदाच्या ४९ दिवसांत राजीनामा देणारे अरविंद केजरीवाल व ‘आप’ची लोकप्रियता कमालीची वाढली. त्यामुळे मध्यमवर्गाचे नुकसान झाले, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र ‘ऑर्गनायझर’मध्ये म्हटले आहे. वास्तविक मध्यमवर्गीयांनीच आपला मते दिली. त्यामुळे त्यांची अडचण आहे, परंतु भाजपसाठी वाट सोपी नाही. आपने तळागाळात काम केले. सत्तेच्या विरोधात भूमिका घेतल्याने समर्थक मिळवले, असे संघाला वाटते.

नकारात्मक भाष्य टाळावे : मोदींमुळे भाजप सोशल मीडियावर सक्रिय आहे. परंतु सोशल मीडियाच्या या युगात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पक्षाच्या नेत्यांना दिले आहे. टि्वटर किंवा फेसबुकवर काम करताना नेत्यांनी कमीत कमी नकारात्मक भाष्य करावे, असा सल्ला संघाने दिला आहे.
पुढे वाचा, भाजपची मते ५% नी घटली...