आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

77% माता म्हणाल्या, मुलाच्या जन्मानंतर पतीही वागतात मुलांसारखेच, दोन मुलांची जबाबदारी सांभाळावी लागते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ‘लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा’ या काव्यातून हवेहवेसे वाटणारे बालपण आपल्याकडे पुरुष वडील झाल्यानंतर जास्त अनुभवायला मिळत असल्याची भावना भारतीय महिलांची आहे. वडील झालेला पुरुष पत्नीसाठी अतिरिक्त ओझे ठरतो. तो स्वत: मुलासारखाच होऊन जातो, असे महिलांचे मत आहे. एका मोबाइल पॅरेंटिंग अॅपने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली  आहे.
 
भारतातील साधारण १ हजार महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात गरोदर महिला व ३ वर्षांचे मूल असणाऱ्या मातांचा समावेश आहे. पती पिता म्हणून कितपत जबाबदार व मदत करतो, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यात मुलाची जबाबदारी उचलणे तर दूरच, मुलाच्या जन्मानंतर पतीचे आमच्यावर अतिरिक्त ओझे झाले आहे, असे ७७ टक्के महिलांनी सांगितले. घरात एका बाळाचा जन्म होतो, मात्र वास्तवात दोन मुले तयार होतात. आम्हाला एकच नव्हे तर दोन मुलांची जबाबदारी उचलावी लागते. काळानुरूप मुले मोठी होतात, मात्र पती तसाच राहतो. त्यांच्यातील लहानपण तसेच राहते. म्हणजे निष्काळजीपणा संपत नाही. 

अॅपने तज्ज्ञांशी बोलून त्यामागची कारणे आणि त्यावरील उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. नवी दिल्लीतील मानसोपचार तज्ज्ञ डाॅ. रश्मी पांडेय म्हणाल्या, महिलांच्या म्हणण्यात बरेच तथ्य आहे. आपल्या समाजातील परंपरा व विचार हे यामागचे कारण आहे. महिला घर सांभाळण्यासाठीच असतात असे अनेकांचे अद्यापही मत आहे.
 
पहिल्यांदा प्रसूत होणाऱ्या महिलांवर या विचारसरणीचा अतिरिक्त ताण पडतो. गरोदरपणा व बाळंतपणानंतर महिलेस शारीरिक व मानसिक त्रासातून जावे लागते हेच मुळात पुरुषांना कळत नाही. सेशेल्स विद्यापीठाच्या डॉ. मिशेल फ्रँक म्हणाल्या, अपत्याची जबाबदारी घेणारे पुरुष भारतात कमी आहेत. जगात महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असली तरी मूल आजारी असेल तर आजही आईलाच सुटी घ्यावी लागते. 

जबाबदारी म्हणजे खेळणी खरेदी, शाळेत प्रवेश एवढेच नाही...
मुलांची जबाबदारी विभागण्याचा अर्थ त्यांच्यासाठी खेळणी खरेदी करणे आणि शाळेत प्रवेश देणे एवढेच मर्यादित नाही. रात्री मूल रडते तेव्हा आई नव्हे तर वडिलांनीही जागे व्हायला हवे. त्याला अंघोळ घालणे, तयार करणे, जेवू घालणे, मुलांना खेळवण्याची जबाबदारीही पत्नीसोबत विभागून स्वीकारली पाहिजे.
 
बातम्या आणखी आहेत...