आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचा मृतदेह लपविलेल्या बेडवर पतीची गर्लफ्रेंडसोबत सुरु होती अय्याशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिरोज आणि त्याची पत्नी अलीमा पहिल्या फोटोत. पिवळ्या टॉपमध्ये सुमन. - Divya Marathi
फिरोज आणि त्याची पत्नी अलीमा पहिल्या फोटोत. पिवळ्या टॉपमध्ये सुमन.
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत एक खळबळजनक प्रकरण उघड झाले आहे. एका पतीने गर्लफ्रेंडच्या साथीने पत्नीची हत्या केली. दोन दिवस मृतदेह बेडमध्ये गुंडाळून घरातच ठेवला आणि तिथेच त्यांचे जेवण खाण्यापासून मौजमस्तीपर्यंतचे रोजचे दिनक्रम सुरु होते.
मृतदेहावर झोपत होते दोघे
- ही खळबळजनक घटना दिल्लीतील शकरपूर भागात घडली आहे. 27 जुलै रोजी महिलेचा मृतदेह एका पोत्यात गुंडाळलेल्या अवस्थेत सापडला.
- आरोपीचे नाव फिरोज आहे. त्याने गर्लफ्रेंड सुमनला सोबत घेऊन पत्नी अलीमाचा खून करुन त्यांच्या रस्त्यातील 'काटा' दूर केला.
- अलीमाचा खून करुन त्यांनी मृतदेह बेडच्या बॉक्समध्ये लपवून ठेवला होता.
- ज्या बेडमध्ये आरोपींनी मृतदेह लपवून ठेवला होता त्याच बेडवर आरोपींची अय्याशी सुरु होती.
- अशी माहिती आहे की हत्येआधी तिघांमध्ये भांडण झाले होते. त्यानंतर मृत महिलेचा पती आणि त्याच्या गर्लफ्रेंडने अलीमाचा ओढणीने गळा आवळून हत्या केली.
- चौकशीत समोर आले की अलीमाची ओळख लपविण्यासाठी आरोपींनी तिचा चेहरा वाईट पद्धतीने विद्रूप केला होता.
- शेजाऱ्यांना फिरोजच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली. त्यासोबतच त्यांना अलीमा दोन दिवसांपासून दिसली नव्हती. यामुळे शेजाऱ्यांना शंका आली.

कसलाच पश्चताप नाही
- पत्नीचा खून करुन गर्लफ्रेंडसह अटक झालेल्या फिरोजला हत्येचा पश्चताप वाटत नाही.
- पोलिसांनी दोघांची कस्टडी मागितली आहे. पोलिस त्यांच्याविरोधात आणखी सबळ पुरावे गोळा करत आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, फिरोजचे घर आणि त्याची गर्लफ्रेंड
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...