आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hyderabad Become Common Capital Amon Srilanka, Tamil Issues

हैदराबाद हे आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांचे केंद्रशासित प्रदेश असेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर हैदराबादला केंद्रशासित प्रदेश करण्याचा केंद्र सरकारचा विचार सुरु आहे. केंद्रशासित प्रदेश घोषित करून आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांची ती संयुक्त राजधानीचा दर्जा देण्याचा मध्यममार्गी तोडगा काढण्याचा सरकारचा विचार आहे. सध्या चंदिगड ही पंजाब आणि हरयाणाची संयुक्त राजधानी आहे. त्याच धर्तीवर हैदराबादलाही संयुक्त राजधानीचा दर्जा देण्यात येण्याची शक्यता आहे.


सीमांध्र भागातील काँग्रेस, तेलगू देसम खासदारांचा सातत्याने सुरू असलेला तीव्र विरोध आणि राज्यात अनेक ठिकाणी विभाजनाच्या मुद्द्यावरून उसळलेला जनक्षोभ पाहून केंद्र सरकारला हा विचार करणे भाग पडत आहे. उच्चस्तरीय वर्तुळातील या आंदोलनाची गंभीर दखल घेण्यात आली. अर्थात अद्याप यावर निर्णय झालेला नाही. तेलंगणा निर्मितीची घोषणा झाल्यानंतर सीमांध्र भागातील जनतेमध्ये डावलल्याची भावना निर्माण झाली होती. अांध्र प्रदेशातून तेलंगणा राज्य वेगळे काढून हैदराबादला 10 वर्षांसाठी संयुक्त राजधानी म्हणून ठेवल्यास सीमांध्र भागातील जनतेला तेवढाच दिलासा मिळेल, असाही विचार या मागे आहे.


एकच राजधानी का?
हैदराबादला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता आणि संयुक्त राजधानीचा दर्जा दिल्यास सीमांध्र भागातील जनेतेचे हित जपले जाईल, असा संदेश त्यातून जनतेत जाईल. त्यामुळे केंद्र सरकारने हा विचार केला आहे.


येत्या 20 दिवसांत प्रक्रिया सुरू
स्वतंत्र तेलंगणा निर्मितीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू करण्यासाठी पुढील 20 दिवसांत कॅबिनेटसमोर प्रस्ताव ठेवला जाणार आहे, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. आंध्र प्रदेशच्या विभाजनामुळे निर्माण होणारे प्रश्न आणि विविध मुद्द्यांचा विचार करण्यासाठी मंत्रिगट स्थापन केला जाणार आहे. त्यानंतर स्वतंत्र राज्यनिर्मितीचा ठराव आंध्र प्रदेश विधिमंडळाकडे पाठवण्यात येणार आहे.