आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hyderabad House, Vidyan Bhavan Become Clean Building

स्वच्छता अभियान: हैदराबाद हाऊस, विज्ञान भवन ठरल्या स्वच्छ वास्तू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - हैदराबाद हाऊस, विज्ञान भवन, जवाहरलाल नेहरू भवन या राजधानी दिल्लीतील सर्वात स्वच्छ वास्तू ठरल्या आहेत. सरकारी इमारतींमध्ये या इमारती देखण्या तर आहेतच, त्याचबरोबर त्या स्वच्छदेखील आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत (एसबीए) रेटिंग्जमध्ये या इमारती अव्वल ठरल्या आहेत. परंतु या स्पर्धेत राष्ट्रपती भवन व पंतप्रधानांचे कार्यालय (पीएमओ) या इमारती पिछाडीवर पडल्या आहेत. सेंट्रल पब्लिक वर्क्सतर्फे (सीपीडब्ल्यूडी) जारी करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे. गेल्या महिन्यात विविध निकषांच्या आधारे सरकारी इमारतींमधील स्वच्छतांचा स्तर तपासण्यात आला.

शहरी विकास मंत्रालय, पीएमओंची पिछाडी : आश्चर्य म्हणजे पीएमओसह या अभियानाची जबाबदारी असणा-या शहरी विकास मंत्रालय ही दोन्ही कार्यालये यादीत पिछाडीवर आहेत. त्या ठिकाणी पुरेशा कचराकुंड्या नाहीत. साफसफाई व इतर सुविधांकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही, असे सर्वेक्षणात दिसून आले. अर्थ मंत्रालय, नॉर्थ ब्लॉकने १२ गुण मिळवून ब-यापैकी कामगिरी केली.

राष्ट्रपती भवन सहाव्या स्थानी
हैदराबाद हाऊस, विज्ञान भवन व जवाहरलाल नेहरू भवनने या पाहणीत प्रत्येकी २० गुण प्राप्त केले, तर राष्ट्रपती भवन १४ गुण मिळवून सहाव्या स्थानी राहिले. साऊथ ब्लॉकलाही १४ गुणच मिळाले. या दोन्ही इमारती सहाव्या स्थानी राहिल्या. या इमारतींचे सर्वेक्षण सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटने (सीपीडब्ल्यूडी) गेल्या महिन्यात केले होते. त्यात इमारतींचा परिसर, त्या ठिकाणी स्वच्छतेबाबत धरण्यात येणारा अाग्रह, स्वच्छतेशी निगडित वस्तू, सुविधा, डस्टबिन, भिंतींचे कॉर्नर आदी मुद्द्यांची पाहणी करण्यात आली.
कृषी विभागालही कमी गुण
पाहणीत अव्वल स्थानावर असलेल्या हैदराबाद हाऊस, विज्ञान भवन, जवाहरलाल नेहरू भवन आदी इमारतींना स्वच्छतेबाबतच्या पायाभूत सुविधांची उपलब्धता व पालन करण्यासाठी १० पैकी आठ गुण देण्यात आले. तसेच कचराकुंड्यांची उपलब्धता व वापर यासाठी २ गुण देण्यात आले. १८ गुणांसह सरदार पटेल भवनने दुसरे स्थान मिळवले आहे. तिस-या क्रमांकावर सीएजीची नवी इमारत आहे. तिला १७ गुण मिळाले. कृषी भवन व शास्त्री भवन या इमारतींना ८ गुण मिळाले. लोकनायक भवनाला १० गुण मिळाले.