नवी दिल्ली - राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) 29 मे रोजी हैदराबादमध्ये आयएस मॉड्यूलच्या पाच संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीतून विविध खुलासे होत आहेत. एनआयए आयजी संजीवकुमार यांनी सांगितले की, दहशतवादी कारवाई घडवण्यासाठी त्यांना मध्य पूर्वमधील देशांमधून निधी मिळत होता. यापैकी एका संशयिताने शेजारील देशातून सिरीयामध्ये जाण्याचा प्रयत्नही केला होता.
आणखी ही नवीन माहिती आली समोर..
- संजीवकुमार यांनी सांगितले की, ''अटक झालेल्या लोकांनी मनी ट्रांसफर चॅनलच्या माध्यमातून पैसे घेतले होते.''
- ''यांच्या ट्रांजॅक्शन सोर्सवर आम्हाला शंका आहे, त्याचाही तपास सुरू आहे.''
- ''हे लोक बॉम्ब बनवण्यासाठी हैदराबादजवळील काही ठिकाणांचा तपास घेत होते.''
- ''स्फोटांनंतर लपण्यासाठी हे लोक या ठिकाणांचा उपयोग करणार होते.''
आयएससाठी घेतली होती शपथ..
संजीवकुमार यांनी सांगितले की, ''या लोकांनी आयएस आणि कमांडर बगदादीसाठी काम करण्याची शपथ घेतली होती. शिवाय दुस-या संशयितांची या प्रकरणात काय भूमिका होती. त्याचाही तपास घेतला जात आहे. त्यांच्याकडून जप्त केलेल्या सामानाचाही तपासासाठी आधार घेतला जात आहे.''
11 जणांना घेतले होते एनआयएने ताब्यात..
- गुप्त सुत्रांकडील माहितीनुसार, NIA ने गेल्या बुधवारी हैदराबादेेतील विविध भागातून आयएसच्या 11 संशयितांना ताब्यात घेतले होते. चौकशी केल्यानंतर त्यापैकी 6 लोकांना सोडून देण्यात आले. मात्र, दोन संगणक अभियंते भाऊ व इतर 5 जणांना अटक करण्यात आली. या संशयितांनी घराचे किचन आणि बेसमेंटमध्ये स्फोटके लपवल्याचे तपासात समोर आले. हे सर्व सीरियात बसलेल्या आयएसच्या एका हँडलरच्या संपर्कात होते. भारतात दहशतवादी कारवाई घडवण्यासाठी संशयितांना 15 ते 20 लाख रुपये आणि लॅॅपटॉप देण्यात आले होते.
पुढे वाचा, या प्रकरणावर काय म्हणाले आवेसी..