आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तर बुटाने मार खाल, भ्रष्टाचाराच्या आरोपावर केंद्रीय मंत्री रिजिजूंचे वक्तव्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी अरुणाचलमधील दोन जलविद्युत प्रकल्पांच्या उभारणीत ४५० काेटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत रिजिजूंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशीही काँग्रेसची मागणी आहे.

दरम्यान, या आरोपांमुळे अस्वस्थ झालेले रिजिजू यांनी भ्रष्टाचाराचे हे आरोप खोटारडे असल्याचे सांगत आरोप करणारे अरुणाचल प्रदेशात आले तर बुटाने मार खातील, असे वक्तव्य केले. यामुळे नवा वाद पेटला. काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी म्हटले आहे की, अरुणाचलमध्ये टेंगो आणि िबगबांग नदीवर ६०० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारले जात आहेत. यात कंत्राटदारांनी रिजिजू यांचे खिसे गरम केले. कंत्राटदाराने बनावट बिले तयार करून ४५० कोटींचा घोटाळा केला. दरम्यान, सुरजेवालांनी एक व्हिडिओ जाहीर केला. यात कंत्राटदार मुख्य दक्षता अधिकाऱ्यावर दबाव टाकत पदोन्नतीबाबत चर्चा करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

मुख्य दक्षता अधिकाऱ्याने या घोटाळ्याचा १२९ पानी अहवाल तयार केला असून अद्याप याबाबत साधा एफआयआर दाखल झाला नसल्याचे सुरजेवाला म्हणाले.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...