आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मी आयएसआयचा एजंट; भारतात स्थायिक होऊ इच्छितो’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली  - दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी एका पाकिस्तानी नागरिकास (वय ३८ वर्षे) ताब्यात घेण्यात आले. मी पाकिस्तानी गुप्तचर संस्था  आयएसआयचा एजंट आहे, असा दावा त्याने विमानतळावरील मदत  काउंटरवर जाऊन केला.
दुबईहून आलेल्या या व्यक्तीला पुढील फ्लाइटने काठमांडूला जायचे होते. या व्यक्तीचे नाव मोहंमद अहमद शेख असे सांगण्यात आले. तो शुक्रवारी सकाळी दुबईहून एअर इंडियाच्या फ्लाइटने पोहोचला होता. मदत काउंटरवर पोहोचून त्याने सांगितले की, मी पाक गुप्तहेर संस्था आयएसआयचा एजंट आहे. पण आता मला हे काम करायचे नाही. मी  भारतात राहू इच्छितो. 
 आयएसआयच्या ताब्यात आहे कुटुंब : चौकशीत कळले की, अहमदचे आयएसआयशी संबंध आहेत. तो या पाक गुप्तचर संस्थेची साथ सोडू इच्छित होता. पण त्याचे कुटुंब आयएसआयच्या ताब्यात आहे. अहमद भारतात राहू इच्छितो आहे. अहमदच्या बाबतीत आयबी आणि रॉच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली गेली आहे आणि ते सध्या त्याची चौकशी करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...