आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Am Not Shila Dikshit, Kejriwal Said To PM Modi

मी शीला दीक्षित नाही, मोदींची झोप उडवून देईन - अरविंद केजरीवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीत महिलांवर अत्याचाराच्या घटनांत वाढ होत आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वस्थपणे झोपू देणार नाही. शांतपणे बघत बसायला मी शीला दीक्षित नाही, असे सांगून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ढासळत्या परिस्थितीला केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारे दिल्ली पोलिस जबाबदार आहेत. खरे तर दिल्लीत सध्या जंगलराज आहे. म्हणूनच केंद्राने आमच्याकडे एक वर्षासाठी पोलिस विभाग द्यावा. शहरातील कायदा-सुव्यवस्था सुरळीत करू, व्यवस्थेला वठणीवर आणू, असे त्यांनी म्हटले आहे. दिल्लीत आणखी दोन मुलींवर अत्याचार झाला आहे. त्याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार आहे. म्हणूनच शहराची व्यवस्था सुधारण्यासाठी आमच्याकडे पोलिस विभागाची सूत्रे द्या. आम्ही कायद्याचे राज्य आणू, असा दावा त्यांनी केला. स्मार्ट सिटीच्या प्रकल्पावरून त्यांनी केंद्र सरकारवर टीकाही केली. सामान्य नागरिक गरिबीत जगत आहेत. अजूनही असंख्य बेरोजगार पोटापाण्यासाठी भटकंती करत आहेत.

भेदभाव का ?
दिल्लीत व्हीआयपी भागात २४ तास पाणीपुरवठा होतो. मात्र, उर्वरित भागात पुरेसे पाणीही मिळत नाही. हा अन्याय आहे. सामान्य माणसाला मात्र पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ येते. राजकारणात आपण परस्परांशी झगडा करतो, परंतु सरकार स्थापनेनंतर मात्र आपण एकत्र येऊन लोककल्याणाची कामे केली पाहिजेत, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

पुढे वाचा.. दिल्ली पोलिस अयशस्वी