आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझे वडील शहीद, पण ते तुमच्या कल्पनेतील शहीदाप्रमाणे नाहीत - गुरमेहर पुन्हा चर्चेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरमेहर कौर श्रीराम कॉलेजमध्ये इंग्लिश लिटरेचरची स्टुडेंट आहे. ती मूळची लुधियाना येथील रहिवासी आहे. (फाईल) - Divya Marathi
गुरमेहर कौर श्रीराम कॉलेजमध्ये इंग्लिश लिटरेचरची स्टुडेंट आहे. ती मूळची लुधियाना येथील रहिवासी आहे. (फाईल)
नवी दिल्ली - माझ्या वडिलांना पाकिस्तानने नाही, तर युद्धाने मारले असा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणारी गुरमेहर कौर आपल्या ब्लॉगवरून पुन्हा चर्चेत आहे. यावेळी तिने 'आय अॅम' नावाच्या ब्लॉगमध्ये 'मी तुमच्या शहीदाची मुलगी नाही' असे म्हणत आपल्याच शब्दात लोकांना आपली ओळख पटवून देण्याचा प्रयत्न केला.
 
वाचा तिचा सविस्तर ब्लॉग...
- "मी कोण आहे या प्रश्नाचे उत्तर काही दिवसांपूर्वी मी हसतमुखाने देत होते, मात्र आता मी तसे करू शकणार नाही."
- "ट्रोल्स जे मांडतात मी तीच आहे का? मी तशी आहे का, जसे माध्यमांनी सांगितले? लोक जसा विचार करतात मी तशीच आहे का? नाही, मी यापैकी कुणीच नाही." 
- "ज्या मुलीला तुम्ही टीव्हीवर पाहिले असेल. निश्चितच ती माझ्यासारखीच दिसते. तिच्या चेहऱ्यावर चमकणाऱ्या विचारांच्या उत्स्फूर्ततेमध्ये माझी झलक आहे. ती उग्र आहे, मी सहमत आहे, मात्र ब्रेकिंग न्यूजमध्ये झळकणारी मी नाही." 
- "शहीदाची मुलगी... मी माझ्या वडिलांची मुलगी आहे. मी पप्पांची गुलगुल आहे. मी त्यांची बाहुली आहे. मी दोन वर्षांची एक कलाकार आहे जिला शब्द कळत नाहीत. मात्र, काड्यांची आकृती समजते जी माझे वडील बनवायचे."
 
बहिणीसाठी पॉप कल्चर गाईड...
- गुरमेहर पुढे लिहिते, की "मी माझ्या आईची डोकेदुखी आहे. विचार मांडणारी, प्रचंड मूडी लेक आहे, जिच्यात आईची सावली आहे. मी आपल्या बहिणीची पॉप कल्चर गाईड आहे."
- "मी वर्गात पहिल्या बेंचवर बसणारी मुलगी आहे, जी आपल्या शिक्षकांसोबत कुठल्याही वाद-विवाद करायला लागते. कारण, यातच साहित्याची खरी मजा आहे."
- "मला वाटते मी माझ्या मित्र-मैत्रीणींना आवडते. माझा सेन्स ऑफ ह्युमर ड्राय असल्याचे ते सांगतात. पुस्तके आणि कविता मला दिलासा देतात."
 
युद्ध नको, घातक परिणामांची जाणीव
- गुरमेहरने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले "मी आदर्शवादी, अॅथलीट आणि शांततेची समर्थक आहे. अपेक्षेप्रमाणेच, मी उग्र आणि युद्धाला विरोध करणारी बिचारी मुळीच नाही."
- "युद्धाची काय किंमत मोजावी लागते याची मला जाणीव आहे. त्यामुळेच, माझा यास विरोध आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, मला माहिती आहे, मी युद्धाची किंमत दररोज मोजली आहे."
 
वडील सोडून जातील अशी भिती होती
- गुरमेहरने पुढे लिहिले की "पप्पा माझ्यासोबत नाहीत. 18 वर्षांपासून ते माझ्यासोबत नाहीत. 6 ऑगस्ट 1999 रोजी माझ्या शब्दकोषात नवे शब्द जोडले गेले... मृत्यू, पाकिस्तान आणि युद्ध."
- "माझे वडील एक शहीद आहेत. पण, मी त्यांना अशा पद्धतीने ओळखत नाही. एक मोठी कार्गो जॅकेट घालणारे व्यक्ती माझे वडील होते. ज्या जॅकेटचा खिसा नेहमीच मिठायांनी भरलेला होता."
- "ज्याचा खांदा मी घट्ट पकडत होते, जेणेकरून ते मला सोडून कुठेही जाणार नाहीत. तरीही, ते गेले आणि कधीच परतले नाहीत. माझे वडील शहीद असून मी त्यांची मुलगी आहे, तुमच्या शहीदाची मुलगी नाही.
 
डीयूत कॉन्ट्रोवर्सी कधी व कशी सुरू झाली? यात गुरमेहरची एंट्री कशी झाली?
- दिल्लीच्या रामजस कॉलेजात एक सेमिनार पार पडणार होता. यामध्ये जेएनयूचे स्टुडेंट लीडर उमर खालिद आणि शहला रशीद यांना आमंत्रित करण्यात आले होते. एबीव्बीपीने यास तीव्र विरोध केला, कारण खालिदवर जेएनयूत देशविरोधी घोषणाबाजी केल्याचा आरोप आहे.
- यानंतर एआयएसए आणि एबीव्हीपीच्या स्पोर्ट्समध्ये हिंसाचार झाला. त्यानंतर कॉलेज प्रशासनाला सेमिनार रद्द करावा लागला. 
- याच दरम्यान गुरमेहर कौरने 22 फेब्रुवारी रोजी आपले फेसबूक प्रोफाईल पिक्चर बदलून 'सेव डीयू कॅम्पेन सुरू केला.'
- हातात एक पाटी धरून 'स्टुडेंट्सअगेन्स्टएबीव्हीपी' या हॅशटॅगसह "मी दिल्ली युनिवर्सिटीची स्टुडेंट असून मी एबीव्हीपीला भीत नाही. मी एकटी नाही, प्रत्येक स्टुडेंट माझ्यासोबत आहे."
 
कोण आहे गुरमेहर?
गुरमेहर कौर श्रीराम कॉलेजमध्ये इंग्लिश लिटरेचरची स्टुडेंट आहे. ती मूळची लुधियाना येथील रहिवासी आहे. पिता कॅप्टन मंदीप सिंह काश्मीरात राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पमध्ये 1999 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले. त्यावेळी गुरमेहर 2 वर्षांची होती.
 
कशी आली वादात?
गतवर्षी 28 एप्रिल रोजी गुरमेहर कौर हिने सोशल मीडियावर 4 मिनिटांचा व्हिडिओ अपलोड केला होता. यामध्ये एका-पाठोपाठ एक 36 पोस्टर दाखविले होते. त्यापैकी 13 नंबरच्या पोस्टरवर तिने "माझ्या वडिलांना पाकिस्तानने नाही, तर युद्धाने मारले." असे लिहिले. 
एबीव्हीपीच्या विरोधात गुरमेहर कौरची ऑनलाईन मोहिम सुरू असतानाच हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर ट्रोल्सने तिचा 13 नंबरचा पोस्टर व्हायरल केला. यानंतर आपल्याला एबीव्हीपीकडून कथित धमक्या मिळत असल्याचा आरोप सुद्धा गुरमेहरने केला होता. 
 
पु़ढील स्लाईड्समध्ये वाचा, 36 पोस्टरचा व्हिडिओ गतवर्षी शेअर करण्यात आला होता, गुरमेहर आता वादात कशी आली?
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...