नवी दिल्ली - टेनिसची सुपरस्टार मारिया शारापोव्हाने सचिन तेंडुलकरला ओळखत नसल्याचे वक्तव्य केल्याने तिला सोशल मिडियावर सचिनच्या समर्थकांच्या रागाचा सामना करावा लागत आहे. सगळेच शारापोव्हावर टीका करत आहेत. शारापोव्हावर नवे जोक्स तयार करून ते शेअर केले जात आहेत. त्याचबरोबर तिच्या
फेसबुक पेजवरही अत्यंत तीव्र भावना व्यक्त करणा-या कमेंट्स करण्यात येत आहेत. गुरुवार दुपारपर्यंत 'Who is a Maria Sharapova' हा ट्रेंड ट्वीटरवर टॉपवर होता. शारापोव्हाच्या फेसबूक पेजवर त्यांच्या प्रत्येत पोस्टवर भारतीय सचिनची महानता वर्णन करणा-या बातम्या पोस्ट करत आहेत.
शारापोव्हा ला भारतातूनही समर्थन
बहुतांश भारतीय शारापोव्हावर राग व्यक्त करत असले, तरी या प्रकरणाची विनाकारण चर्चा केली जात असल्याचे मतही काहीजण व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर काही जणांनी पोस्ट केले की, शारापोव्हा रशियाची आहे. त्याठिकाणी क्रिकेटबाबत फारशी चर्चा नसते. त्यामुळे खरंच ती सचिनला ओळखत नसावी. काही जणांनी तर सचिनला न ओळखणे हा गुन्हा नसल्याचेही म्हटले आहे.
फोटो : सचिनच्या समर्थकांनी शारापोव्हाचा हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून राग व्यक्त केला.