आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनी प्रशासकीय, तर मनमोहन सिंगांनी आर्थिक सुधारणा केल्या, दोघेही माझे मित्र- ओबामा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी नोकरशाहीचे आधुनिकीकरण करत आहेत. तर, मनमोहनसिंग यांनी आधुनिक भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया रचला, असे मत अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केले. भारताच्या दौऱ्यावर असलेले ओबामा दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. मोदी आणि मनमोहनसिंग दोघांचीही स्तुती करताना त्यांनी मोदी मला आवडतात, पण मनमोहनसिंग यांचाही मी प्रशंसक आहे, असे सांगितले. 


२० जानेवारीला ओबामा अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर पायउतार झाले. यानंतर ओबामा व मोदी यांच्यात प्रथमच चर्चा झाली. ओबामा फाउंडेशनच्या कार्यक्रमानिमित्त ते भारतात आले आहेत. ते म्हणाले, भारतासाठी मोदींनी व्हिजन ठरवले आहे. सर्वच क्षेत्रांत ते विविध पद्धतीने आधुनिकीकरण आणत आहेत. परंतु डॉ. मनमोहनसिंग यांनी त्यांच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था जगासाठी खुली करण्यासह अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले.

 

२००८ मध्ये आर्थिक मंदीमुळे होणाऱ्या दुष्परिणामापासून  बचाव करण्यात डॉ. सिंग यांचे मोलाचे योगदान होते. डॉ. सिंग यांनी उदार अर्थव्यवस्था आणली तर मोदींनी पॅरिस कार्बन उत्सर्जन करार केला. या दोन्ही निर्णयांत मोठे धाडस लागते. दोघांनीही त्यांच्या देशासाठी कठोर पावले उचलली आहेत. या दोघांच्या कार्यकाळात भारत आणि अमेरिकेचे संबंध दृढ झाल्याचे ओबामा म्हणाले. भारतीय मुस्लिम या देशाशी आपली नाळ असल्याचे मानतात. त्यामुळे सहिष्णुतेने विचार करण्याची गरज आहे. २०१५ मध्ये भारतीय दौऱ्यात ओबामांनी सहिष्णुता आणि कुठल्याही धर्म, पंथाला मानण्याचा अधिकार असायला हवा, असे मत मांडले होते.

 

डाळ बनवणारा मी पहिला अमेरिकी राष्ट्राध्यक्ष
गुरुवारी रात्री जेवण्याच्या वेळी वेटर ओबामांना डाळ बनवण्याची कृती सांगत असताना त्यांनी वेटरला याची गरज नसल्याचे म्हटले. कारण पूर्वीपासूनच डाळ बनवता येते. किंबहुना डाळ बनवणारा मी पहिला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहे. शिक्षण घेत असताना भारतीय सहकाऱ्याकडून मी ते शिकल्याचे त्यांनी सर्वांना सांगितले. चिकन व्यवस्थित बनवू शकतो. पण चपती बनवणे अवघड असल्याने त्यासाठी कधी प्रयत्न केला नाही, असे सांगताच सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.

 

बराक ओबामा दिल्लीत नेमके काय बोलले हे पाहायचे असल्यास शेवटच्या स्लाई़डवर पाहा त्यांचा व्हिडिओ.... (Video Source- The Obama Foundation) 

बातम्या आणखी आहेत...