नवी दिल्ली - प्रसिद्ध ब्रिटिश प्रवासवर्णन लेखक आणि माजी लष्करी अधिकारी लेव्हिसन वुड यांनी भारतीयांच्या पर्यटन प्रेमाचे कौतुक केले आहे. लेव्हिसन वुड हे ब्रिटिश लष्करात पॅराट्रुपर म्हणून कार्यरत होते. त्यांना साहसी प्रवासाची आवड आहे.
त्यांनी भारताच्या विविध भागात प्रवास केला असून तेथील लोकजीवनाचे बारकाईने निरीक्षणही केले आहे. भारतीय लोकांना पर्यटन आवडते. ते केवळ जगात भ्रमंती करत नसून देशातदेखील भटकंती करतात हे मला विशेष वाटते. मी हरिद्वार भेट दिली तेव्हा तेथे २ दशलक्ष भाविक आले होते.
यातील बहुतांश लोक भगव्या शर्टमध्ये होते. हे दृश्य माझ्यासाठी अद्भूत होते अशा भावना वुड यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या. सध्या वुड नाईल नदीच्या काठाने प्रवास करण्याचे नियोजन करत आहेत. ते इजिप्तविषयी या दरम्यान लेखन करतील.
४२५० मैल पायी प्रवासाचा विक्रम : आफ्रिकेमध्ये लेव्हिसन वुड यांनी ४२५० मैल प्रवास पायी केला. यासाठी त्यांना ९ महिन्यांचा अवधी लागला. वाळवंट, जंगल, युद्धस्थ भूमी अशा विविध प्रदेशातून त्यांनी हा प्रवास केला. पूर्व आफ्रिका भ्रमंतीत आपल्याला विशेष रस आहे असे त्यांनी सांगितले.