आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Raised The Snooping Issue With Kerry: Sushma Swaraj

कोणत्याही परिस्थितीत हेरगिरी सहन करणार नाही, सुषमा यांनी केरींना सुनावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : जॉन केरी यांच्यासह भारतीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्‍वराज

नवी दिल्‍ली - अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांकडून भारताची कोणत्याही प्रकारची हेरगिरी सहन केली जाणार नसल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांना स्पष्टपणे सांगितले आहे. भारताच्या दौ-यावर आलेले केरी आणि स्वराज यांच्यात गुरुवारी भेट झाली. त्यानंतर सायंकाळी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत स्वराज यांनी याबाबत माहिती दिली. काही दिवसांपूर्वी स्नोडेनच्या हवाल्याने परकीय माध्यमांना अमेरिकेने भारत आणि भाजपच्या हेरगिरीला मंजुरी दिल्याचे वृत्त दिले होते.
केरी यांच्यासमोर हेरगिरीचा मुद्दा उपस्थित केला का? असा प्रश्न पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने विचारला होता. त्यावर उत्तर देताना स्वराज म्हणाल्या की, हा मुद्दा केरी यांच्यासमोर मांडला असून कोणत्याही परिस्थितीत हेरगिरी सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केल्याचेही त्यांनी सांगितले.

केरींचा बचावात्मक पवित्रा
याच प्रश्नाचे उत्तर देताना केरी यांनी बचावात्मक पवित्रा स्वीकारल्याचे दिसून आले. ते म्हणाले, हेरगिरीसारख्या मुद्यावर सार्वजनिकपणे चर्चा करणे हे त्यांच्या देशाच्या धोरणाविरुद्ध आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षी संबंधांचा त्यांना आदर आहे. दहशतवादासारख्या मुद्यावर माहितीची देवाण घेवाण व्हावी अशी भूमिकाही त्यांनी मांडली. केरी यांच्या मते, अमेरिकेचे राष्ट्रपती ओबामा यांनीही नुकताच हेरगिरी प्रकरणाचा आढावा घेतला होता.

मोदी आणि भारताचे कौतुक
जॉन केरी यांनी मोदींची प्रचारातील घोषणा, 'सबका साथ, सबका विकास' चे तौंडभरुन कौतुक केले. गुरुवारी इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलजी (IIT) ला भेट देऊन त्यांनी तेथे सुरू असलेल्या संशोधन कार्याचेही कौतुक केले. केरी म्हणाले, पीएम मोदींनी भगव्या क्रांतीचे आव्हान केले आहे. हा रंग उर्जेचे प्रतिक असल्याचेही त्यांनी सांगितले.

विरोधकांची टीका
सुषमा स्वराज आणि जॉन केरी यांच्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसने भाजप आणि केंद्र सरकारवर टीकेची झोड उडवली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना मनीष तिवारी यांनी भाजपच्या करणी आणि कथनीमध्ये तफावत असल्याचे सांगितले. एकिकडे सरकार हेरगिरी झालीच नसल्याचे संसदेत सांगते आणि अमेरिकेसमोर मात्र हेरगिरी झाल्याचे बोलते असे तिवारी म्हणाले.
पुढे पाहा - अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांच्या भारत दौ-याचे फोटो