आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Told At Night, Blow The Pak Boat Off : Coast Guard DIG

\'त्यांना बिर्याणी खाऊ घालायची नाही, बोट उडवून टाका...\' कोस्टगार्डने दिले होते आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कोस्ट गार्डच्या उपमहानिरीक्षकांनी 31 डिसेंबरच्या रात्री उडवण्यात आलेल्या पाकिस्तानच्या बोटीसंदर्भात अगदी सरकारच्या विरोधी वक्तव्य केले आहे. ही बोट उडवण्याचा आदेश मीच दिला होता असे उपमहानिरीक्षक बी.के. लोशाली यांनी स्पष्ट केले आहे. इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्रात यासंदर्भात वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे. त्यानुसार, बी.के. लोशाली म्हणाले होते की, बोट उडवून टाका, आपल्याला त्यांना बिर्याणी खाऊ घालायची नाही.

संशयित बोट उडवून दिली होती हे कोस्टगार्डने प्रथमच खुलेपणाने स्वीकारले आहे. सरकार मात्र उलटा दावा करत आहे. बोटमध्ये असलेल्यांनीच बोटमध्ये स्फोट घडवला होता, असे सरकारचे म्हणणे आहे.

संरक्षण मंत्रालय, संरक्षण मंत्री आणि कोस्ट गार्डनेही यापूर्वी बोटीवरील लोकांनीच आग लावली आणि त्यामुळे स्फोट झाला असा दावा केला होता. त्यावेळीही सरकारच्या या दाव्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाद झाला होता. त्यात आता डीआयजी बी.के. लोशाली यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला आहे. वृत्तपत्रातील माहितीनुसार कोस्ट गार्ड, गांधीनगरचे चीफ ऑफ स्टाफ (नॉर्थ वेस्ट रीजन) लोशाली यांनी कोस्ट गार्डची इंटरसेप्टर बोट आईसीजीएएस सी-421 च्या लाँचच्या वेळी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा दावा केला आहे.

ते म्हणाले, मला एक भाषण देण्यात आले होते. पण मी माझ्या मनाने बोलणार आहे. तुम्हाला 31 डिसेंबरची ती रात्र आठवत असेल अशी आशा आहे. आम्ही त्यावेळी पाकिस्तानी बोट उडवली होती. आम्हीच उडवली होती. मी त्या रात्री गांधीनगरमध्ये होतो. मी म्हणालो, बोट उडवून टाका. आपल्याला त्यांना बिर्याणी खाऊ घालायची नाही. या कार्यक्रमात कोस्ट गार्ड डीआयजी सुधीर सैनी आणि डिप्टी कमांडंट जी सेठी उपस्थित होते.