आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा ६५ वर्षीय शोभा डेंची छेड काढली जाते...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांची तीन तरूणांनी दिवसाढवळ्या छेड काढली होती. हा खुलासा डे यांनी स्वतः येथील एका कार्यक्रमात केला आहे.

इंडिया हॅबिटायट सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्याशी बातचित करताना ६५ वर्षीय शोभा डे म्हणाल्या, 'मी एका दुकानात काही सामान खरेदी करत असताना तिथे तीन जण आले. तिघेही त्यांच्या पेहरावावरून सुखवस्तू कुटुंबातील दिसत होते. ते तिघेही माझ्या अंगचटीला येण्याचा प्रयत्न करत अश्लिल बोलत होते. असे एकदा नाही तर, तब्बल चार-पाच वेळा त्यांनी केले. त्यानंतर मी त्यांच्यावर भडकले आणि त्यांना तिथून पिटाळून लावले.'

शोभा डे म्हणाल्या, ६५ व्या वर्षी जर माझ्या सोबत असे घडत असेल तर माझ्या मुलीला कोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागत असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. ज्यावेळी शोभा डे स्वतःबद्दलचा हा घृणास्पद किस्सा सांगत होत्या तेव्हा संसदेत (सोमवार, १८ मार्च) राजकीय पक्षांचे खासदार महिलांच्या सुरक्षिततेसाठी शारीरिक संबंधांचे वय १८ वरून १६ करण्याची तरतूद असलेल्या विधेयकावर विचारविनिमय करत होते.

शोभा डे म्हणाल्या, भारतातील पौराणिक कथांमध्ये महिलांसोबतच्या छेडछाडीला फारसे महत्त्व दिलेले नाही. आता हा गंभीर विषय झालेला असतानाही आम्ही त्याकडे गांभीर्याने पाहत आहोत असे वाटत नाही.