आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारपेटा मंदिर प्रवेशास मज्जाव, राहुल गांधींचा संघावर आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या आठवड्यात शनिवारी आसाममधील बारपेटा मंदिरात राहुल गांधी. सोबत मुख्यमंत्री तरुण गोगोी. - Divya Marathi
गेल्या आठवड्यात शनिवारी आसाममधील बारपेटा मंदिरात राहुल गांधी. सोबत मुख्यमंत्री तरुण गोगोी.
नवी दिल्ली/बारपेटा - आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला आसाममधील बारपेटा मंदिरात प्रवेश करताना रोखले, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भाजप आणि मंदिर व्यवस्थापनाने मात्र हा आरोप फेटाळून लावला.

संसदेबाहेर पत्रकारांना माहिती देताना राहुल म्हणाले, ‘गेल्या शुक्रवारी मी आसाममधील बारपेटा मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. त्या वेळी संघ कार्यकर्त्यांनी माझ्यासमोर काही महिलांना उभे केले आणि मला मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखले. भाजप अशा पद्धतीने काम करत आहे. संशयित संघ कार्यकर्ते तेथून निघून गेल्यानंतर मी संध्याकाळी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.दरम्यान, भाजपने मात्र राहुल गांधींचा आरोप फेटाळून लावला. राहुल हे आता ‘खोटे बोलणारे यंत्र’ झाले आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली. बारपेटा मंदिराचे प्रमुख बखिस्ता देव सरमा यांनी राहुल गांधींचा आरोप दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...