आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी मोठा की तो मोठा ? खासदारांमध्येच वाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ज्येष्ठ कोण? लोकसभेचा की राज्यसभेचा खासदार? असा शिष्टाचाराचा मुद्दा मंगळवारी राज्यसभेत गाजला. लोकसभेच्या खासदारांच्या तुलनेत आम्हाला कमी लेखले जाते, असे राज्यसभा खासदारांचे म्हणणे होते. सपचे नरेश अग्रवाल यांनी हा मुद्दा उपस्थित केला. राज्यसभा लोकसभेपेक्षा कनिष्ठ आहे का? राज्यसभा खासदारांच्या परदेश दौऱ्यांचा निर्णयही लोकसभाच घेते. शिष्टाचारानुसार राज्यसभेचे सभापती लोकसभाध्यक्षांपेक्षा वरिष्ठ आहेत. ते पंतप्रधानांपेक्षाही वरिष्ठ आहेत, याची आठवणही त्यांनी करून दिली.