आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमनाथ भारतींना पत्नीने मारला टोमणा - मी सुंदर नव्हते म्हणूनच मारझोड करत होते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिपिका मैत्री. - Divya Marathi
लिपिका मैत्री.
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीचे (आप) आमदार आणि दिल्लीचे माजी कायदा मंत्री सोमनाथ भारतींच्या 'सुंदर महिलांची सुरक्षा' या कॉमेंटवर त्यांची पत्नी लिपिका मित्रा यांनीच त्यांच्यावर टीका केली आहे. लिपिका म्हणाल्या, सोमनाथ यांना फक्त सुंदर महिलांचीच चिंता आहे. माझ्यासारख्या सर्वसाधारण दिसणार्‍या महिलांची सुरक्षा कोण करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मी सुंदर नव्हते म्हणूनच कादाचित ते माझ्यासोबत चांगले वागत नव्हते, असा टोमणा देखील लिपिका यांनी मारला.
सोमवारी दिल्ली विधानसभेत विशेष अधिवेशनात महिला सुरक्षेवर बोलताना सोमनाथ भारती म्हणाले होते, की पोलिस जर दिल्ली सरकारच्या अधिकारात दिले तर सुंदर महिला रात्री देखील फिरू शकतील. दिल्ली पोलिस सध्या केंद्र सरकारच्या ताब्यात आहेत.
सोमनाथ भारतींवर कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला होता
लिपिका म्हणाल्या, सोमनाथची मानसिकता निच पातळीची आहे, हे त्याच्या विधानावरुन स्पष्ट होते. लिपिका या पाच वर्षांपासून मुलांना घेऊन वेगळ्या राहातात. त्यांनी सोमनाथ भारतींविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दिली होती. त्यासोबतच महिला आयोग आणि दिल्ली पोलिस आयुक्तांकडेही त्यांनी न्यायाची मागणी केली होती.
भाजप नेत्यांनी साधला निशाणा
भाजपच्या नुपुर शर्मांनी ट्विट करुन सोमनाथ भारतींवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, 'महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न त्यांच्या आत्मसन्मानाशी संबंधीत असतो. व्यक्तीच्या स्वभावाशी निगडीत असतो. तुम्ही स्वतःच्या घरात तेस (सन्मान राखू शकले नाही) करु शकले नाही आता सभागृहात भाषण केल्याने काय फरक पडणार आहे.' दिल्ली विधानसभा निवडणुकीत नुपुर शर्मा यांनी अरविंद केजरीवालांविरोधात निवडणूक लढली होती.

पुढील स्लाइडमध्ये, सोमनाथ भारतींचे खिडकी एक्स्टेंशन प्रकरण
बातम्या आणखी आहेत...