आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढण्यापासून मला रोखले, युपीच्या काँग्रेस नेत्याने केला आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
11 डिसेंबरला 3 वाजता नाव मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर राहुल गांधींची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली जाईल. - Divya Marathi
11 डिसेंबरला 3 वाजता नाव मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर राहुल गांधींची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली जाईल.

नवी दिल्ली - युपी काँग्रेस नेते अयूब अली यांनी दावा केला आहे की, काँग्रेस पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यांना राहुल गांधींच्या विरोधात निवडणूक लढवण्यापासून रोखण्यात आले. अयूब यांनी गुरुवारी न्यूज एजन्सीशी बोलताना म्हटले की, मी काँग्रेस सेंट्रल इलेक्शन अथॉरिटीचे चेअरमन एम. रामचंद्रन यांच्याकडे गेलो होतो. त्यांना सांगितले की, मला काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवायची आहे. ते फार रागात होते,  याठिकाणी फक्त एक कँडिडेट आहेत, ते म्हणजे फक्त राहुलजी. येथून निघून जा. उमेदवारी अर्जाची छाननी केल्यानंतर राहुल हे एकमेव पात्र उमेदवार शिल्लक राहतात. त्यांनी सोमवारी काँग्रेस मुख्यालयात अर्ज सादर केला होता. आता 11 डिसेंबरला 3 वाजता नाव मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर राहुल यांनी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली जाऊ शकते. काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे राहुल गांधी हे नेहरू-गांधी कुटुंबातील सहावे व्यक्ती असतील. 


मंगळवारी अर्जांच्या छाननीनंतर इलेक्शन अथॉरिटीचे चेअरमन आणि रिटर्निंग ऑफिसर मुलापल्ली रामचंद्रन यांनी सांगितले की, काँग्रेस अद्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकूण 89 नामांकने मिळाली. सर्वांमध्ये राहुल गांधींचे नाव आहे. त्यांनी म्हटले की, स्क्रूटनीदरम्यानही सर्व पेपर्स योग्य असल्याचे समोर आले. अध्यक्षपद निवडणुकीसाठी आता फक्त एक पात्र उमेदवार शिल्लक आहे. 


नेहरू-गांधी कुटुंबातील राहुल १३२ वर्षांतील सहावे पक्षाध्यक्ष
राहुल हे अध्यक्षपद सांभाळणारे नेहरू-गांधी कुटुंबाचे सहावे व काँग्रेसचे ६० वे सदस्य असतील. अाई साेनियांच्या जागी त्यांची नेमणूक हाेईल. १३२ वर्षे जुन्या काँग्रेसमध्ये साेनियांनी सर्वाधिक १९ वर्षे पक्षाध्यक्षपद सांभाळले. तसेच गांधी कुटुंबात सर्वाधिक काळ खासदार राहिल्यानंतर राहुल यांच्याकडे अाता ही जबाबदारी येईल. यापूर्वी इंदिरा गांधींची १९५९ मध्ये काँग्रेस अध्यक्षा म्हणून निवड झाली हाेती; परंतु त्या १९६७ मध्ये खासदार प्रथमच बनल्या. याशिवाय राजीव गांधी १९८१ मध्ये खासदार, तर १९८५ मध्ये अध्यक्ष बनले. साेनिया गांधी १९९८ मध्ये अध्यक्ष बनल्या, तर १९९९ मध्ये प्रथम लाेकसभेवर निवडून अाल्या हाेत्या.

 

पुढे वाचा, राहुल गांधींच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीचा वाद..

 

 

बातम्या आणखी आहेत...