आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shila Dixtit Says I Am Not Participated In Delhi Assembly Election

माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित दिल्ली निवडणुकीतून OUT, पक्षादेश पाळणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मागील 15 वर्ष एकहाती सत्तेत असणा-या दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी नव्याने होणा-या विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचवेळी पक्ष श्रेष्ठींकडून मिळणा-या आदेशाचे पालन करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. दिल्लीत नव्याने होणा-या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत असणार आहे असे त्यांनी सांगितले.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे दिल्लीच्या विधानसभेत पराभूत झाल्यानंतर शीला दीक्षित यांना केरळच्या राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले होते. पण केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार आल्यानंतर नव्या सरकारने त्यांना या पदावरून पायउतार होण्यास भाग पाडले. दिल्ली विधानसभा बरखास्त केल्यानंतर राजकीय क्षेत्रात शीला दीक्षित निवडणूक लढवणार की नाही याची चांगलीच चर्चा रंगली होती.
केजरीवालांवर निशाना साधत त्या म्हणाल्या, केजरीवाल केवळ आपली पाठ थोपटण्याचे काम करत आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवालांनी दीक्षित यांना पराभूत केले होते.
पुढील स्लाइडवर वाचा शीला दीक्षितांच्या प्रवासाबद्दल...