नवी दिल्ली - हवाई दलाच्या वतीने तरुणांसाठी थ्री-डी गेमचे गुरुवारी लाँचिंग करण्यात आले. देशातील थ्री-डी गेमचा हा पहिलाच प्रकल्प आहे. हवाई दलामध्ये करिअर करण्यासाठी तरुण वर्गाला आकर्षित करण्यासाठी हवाई दलाने थ्री-डी गेमचा मार्ग निवडला आहे.
गार्डियन्स ऑफ द स्काइज (जीओटीएस) असे गेमचे नाव आहे. भारतीय हवाई दलाकडे अधिकाधिक तरुणांनी वळावे, यासाठी हा प्रकल्प राबवण्यात येत असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. एअर मार्शल एस. सुकुमार यांच्या उपस्थितीत गेमचे लाँचिंग करण्यात आले, असे मत विश्वास सुकुमार यांनी व्यक्त केले.
गेमची संकल्पना अशी
व्हर्च्युल स्वरूपात हवाई दलाचे कामकाज या गेममधून दाखवण्यात आले आहे. ‘झरूझिया’ नावाचा एक काल्पनिक देश असून त्याच्या विरोधात ही मोहीम आहे. अनेक प्रसंग पाकिस्तानसोबतच्या संबंधाशी जुळणारे असल्याचे जाणवते.
(फोटो - हवाई दलाचा थ्री-डी गेम)