आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लव्ह-सेक्स-धोका: विवाहबाह्य संबंधाच्या आरोपात हवाईदल अधिकारी बडतर्फ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय हवाई दलातील अधिका-याच्या विवाहबाह्य संबंधामुळे हवाई दलावर गेल्यावर्षी शिंतोडे उडाले होते. हवाई दलात फ्लाइट लेफ्टनंट पदावर कार्यरत असलेला इशांत शर्मा वरिष्ठ अधिका-याच्या पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवल्याच्या आरोपात दोषी अढळल्यानंतर त्याला बडतर्फ करण्यात आले आहे.

हवाई दलाच्या कोर्ट ऑफ इन्क्वॉयरीमध्ये फ्लाइट लेफ्टनंट इशांत शर्मा दोषी अढळला आहे. कोर्ट ऑफ इन्क्वॉयरीच्या शिफारशीनुसार संरक्षण मंत्रालयाने शर्माच्या बडतर्फीवर शिक्कामोर्तब केले आहे. गेल्या वर्षी 28 नोव्हेंबर रोजी जोधपूर येथील स्क्वॉड्रन अनंदिता दास यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्याशी शर्माचे विवाहबाह्य संबंध असल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.

जोधपूर येथील हवाईदलाच्या दक्षिण- पश्चिम विभागात स्क्वॉड्रन लिडर असलेल्या व्ही. नायर यांची अनंदिता पत्नी होती. पतीसोबत झालेल्या वादानंतर अनंदिता यांनी हवाईदलाच्या अधिकारी निवासस्थानात पंख्याला लटकून आत्महत्या केली होती. अनंदिता या देखील हवाई दलात स्क्वॉड्रन पदावर कार्यरत होत्या.

इशांत शर्मा जोधपूरमध्ये लढाऊ विमान सुखोई-30 चा स्क्वॉड्रन पायलट होता. त्याच वेळी त्याचा संबंध स्क्वॉड्रन लिडर अनंदिता दास यांच्याशी आला होता.