आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • IAF Plane Carrying President #PranabMukherjee To Chennai, Returns To Delhi After Developing Technical Snag Mid Air

चेन्नईकडे जाणार्‍या राष्ट्रपतींंच्या IAFच्या विमानात तांत्रिक बिघाड, दुसर्‍या विमानाने रवाना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना श्रद्धांजली देण्यासाठी चेन्नईकडे रवाना झालेले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आयएएफ विमान पुन्हा दिल्लीत परतले आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेली माहिती अशी की, राष्ट्रपतींच्या विमानाने उड्डान घेतल्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड ‍झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. पालमपूर विमानतळावर हे विमान सुरक्षित उतरवण्यात आले.

राष्ट्रपती बिझनेस जेटने चेन्नईला रवाना...
- प्रणब मुखर्जी बोइंग बिझनेस जेटने चेन्नईला रवाना झाले.
- मिड एअरमध्ये झालेला तांत्रिक बिघाड वैमानिकाच्या लक्षात आल्याने पालनपूर एअरपोर्टवर विमान उतरवण्यात आले होते.
- त्यानंतर राष्ट्रपती विशेष बिझनेस बोइंग जेटने चेन्नईला रवाना झाले. सरकारन 2005 मध्ये तीन विशेष विमान खरेदी केले होते. त्यापैकी हे एक आहे.
- VVIPच्या प्रवासासाठी सरकारने 937 कोटी रुपये खर्च करून खास जेट खरेदी केले होते.
- संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, राष्ट्रपतींसाठी पर्यायी विमान सज्ज ठेवण्यात आले होते.
बातम्या आणखी आहेत...