आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- आयएएस, आयपीएस, आयएफएस होण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आहे. केंद्राने यूपीएससी परीक्षेस बसण्यासाठी आणखी दोन संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आता सामान्य वर्गातील परीक्षार्थींना 6, तर इतर मागासवर्गीयांना 7 वरून 9 वेळा परीक्षा देण्याची संधी मिळेल. हा निर्णय यंदाच लागू होणार आहे. परीक्षेसाठी वयोर्मयादाही शिथील केली आहे. कार्मिक मंत्रालयाने सोमवारी याबाबत माहिती दिली. वेळापत्रकानुसार 24 ऑगस्टला यूपीएससीची पूर्वपरीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची तारीख अद्याप घोषित झालेली नाही. म्हणजेच नव्या तारीखेसाठी नवा निर्णय लागू राहील.
निर्णयाचा अर्थ असा..
खुला गट : या वर्गातील विद्यार्थ्यांना 4 वेळा संधी होती. आता त्यांना 6 वेळा संधी मिळेल. 21 ते 30 वर्षांची पूर्वी मर्यादा होती. आता वय 30 वष्रे पूर्ण असले आणि चार वेळा परीक्षा दिलेली असेल तरी ते अर्ज करू शकतील. 6 संधींसाठी त्यांना वयाच्या 32 वर्षांपर्यंत सूट मिळेल.
मागास प्रवर्ग : पूर्वी 7 वेळा परीक्षा देता येत होती. आता 9 संधी. वयाची अट सध्या 21 ते 33 आहे. म्हणजेच, ज्यांचे वय 33 पूर्ण आहे आणि 7 वेळा ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांना 9 संधींसाठी 35 वष्रे वयापर्यंत अट शिथील.
सर्मथनार्थ युक्तिवाद
>गतवर्षी यूपीएससीच्या परीक्षा पद्धतीत झालेल्या बदलाचा फटका बसलेल्यांना होईल लाभ.
>ग्रामीण भागातील विद्यार्थी मिळणार्या अधिक संधींमुळे परीक्षेची चांगली तयारी करू शकतील.
>जागा वाढल्यामुळे नव्या उमेदवारांचे नुकसान नाही.
>1979 मध्ये पॅटर्न बदलला तेव्हाही सर्वांना 3 अधिक संधी मिळाल्या.
विरोधकांचा तर्क
>निवडणुकीच्या तोंडावर विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी निर्णय.
>या परीक्षांतून टॅलेंट शोधले जाते. त्यामुळे एवढय़ा संधी नकोतच. यामुळे कष्टही वाया जातील.
>संधी वाढल्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांचा दर्जा ढासळलेला असेल.
>यापेक्षा जीके इंग्लिशसोबत मॅनेजमेंटसारखे विषय सक्तीचे करायला हवे होते.
यांच्यावर परिणाम नाही
अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कितीही वेळा ही परीक्षा देता येते. यासाठी वयाची अट 35 वर्षे होती. यांच्यावर नव्या निर्णयाचा परिणाम होणार नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.