आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुर्गाशक्तीपाठी सोनिया गांधी; निलंबनप्रकरणी पंतप्रधानांना पत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशातील गौतम बुद्धनगरच्या उपविभागीय दंडाधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांच्या निलंबन प्रकरणाची काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दखल घेतली आहे. यासंदर्भात सोनियांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र लिहून यात केंद्र सरकार काही करू शकते काय, अशी विचारणा केली आहे.
सोनिया पत्रात म्हणतात की, अधिकार्‍यांवर कुठेही अन्याय होणार नाही याची हमी दिली पाहिजे. बेधडक, निर्भयपणे काम करू शकतील असे वातावरण अधिकार्‍यांना दिले पाहिजे.

जवळपास एक आठवडा उलटल्यानंतरही काँग्रेसने या प्रकरणी मौन बाळगले होते. दुर्गा शक्ती प्रकरणात पक्षाच्या एकाही नेत्याने अखिलेश यादव सरकारचा विरोध केला नव्हता. राज्य सरकारचे प्रकरण असल्याचे सांगत पक्ष हात झटकत होता. आता सोनियांच्या पत्रानंतर नेतेदेखील सपा सरकारच्या या निर्णयावर टीका करत आहेत.

आणखी दोन पत्रे पाठवा : सपा
सपा नेते नरेश अग्रवाल यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, साोनियांनी आणखी दोन पत्रे पाठवली पाहिजेत. हरियाणात सोनियांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्याशी संबंधित सौदा रद्द करणारे आयएएस अधिकारी अशोक खेमका यांची बदली करण्यात आली होती. तसेच राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी दोन आयएएस अधिकार्‍यांना निलंबित केले होते. ते सर्व जण वढेरा यांच्याशी संबंधित सौद्याप्रकरणीच कारवाई करत होते.