आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • IAS Officers Releated Laws Union Government May Changing

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयएएस अधिका-यांशी संबंधित नियमांत केंद्र सरकार करणार बदल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दुर्गाशक्ती नागपाल प्रकरणानंतर सरकारला शहाणपण सुचले. त्यामुळेच आयएएस अधिका-यांशी संबंधित नियमांत बदल करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. कोणाच्या तरी मनमानीपणाचा फटका अधिका-यांना बसू नये, असे केंद्र सरकारला वाटू लागले आहे.


भारतीय प्रशासन सेवेशी संबंधित कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या वतीने या मुद्द्यावर सखोल विचार केला जात आहे. 1969 च्या कायद्यात सुधारणा करण्याचा केंद्राचा विचार आहे. हा कायदा अधिका-यांची आचारसंहिता आणि दाद-फिर्यादीशी संबंधित आहे. एखाद्याचा विशिष्ट हेतू किंवा राजकीय सूडभावनेतून बदली केली जात असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे.


कोणत्या विभागांना लाभ ?
कार्मिक विभागाकडून मांडण्यात येणा-या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर त्याचा फायदा प्रशासन सेवेतील आयएएसशिवाय पोलिस दल (आयपीएस), वन सेवा (आयएफओएस) यांनादेखील होईल.


यांच्याशी सल्लामसलत
केंद्र सरकारने दुर्गाशक्ती प्रकरणाचा बोध घेतला असल्यामुळेच कायद्यातील बदलासाठी सरकार गृह विभाग (आयपीएस), वने व पर्यावरण विभागासोबत अगोदर चर्चा करेल. त्यानंतर त्याबाबत निर्णय होईल.