आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • IAS Trainee Officer Die Trying To Rescue Woman Colleague In South Delhi Ber Sarai IAS

महिला सहकाऱ्याला वाचवण्‍यासाठी IAS अधिकाऱ्याने मारली स्विमिंग पुलमध्‍ये उडी, बुडून मृत्‍यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आशिषच्‍या कुटुंबियांनी या घटनेमागे घातपाताचा संशय व्‍यक्‍त केला आहे. - Divya Marathi
आशिषच्‍या कुटुंबियांनी या घटनेमागे घातपाताचा संशय व्‍यक्‍त केला आहे.
नवी दिल्‍ली- येथे सोमवारी रात्री स्विमिंग पुलमध्‍ये बुडून आशिष दाहिया या IAS अधिकाऱ्याचा मृत्‍यू झाला. दिल्‍लीतील विदेश सेवा इन्‍स्‍टीट्युटमध्‍ये आशिष त्‍यांच्‍या 25 मित्रांसोबत (ट्रेनी अधिकारी) पार्टी करत होते. यादरम्‍यान एक महिला अधिकारी पाय घसरुन स्विमिंग पूलमध्‍ये पडली. तिला वाचवण्‍यासाठी आशिषने त्‍याच्‍या काही मित्रांसह स्विमिंग पुलमध्‍ये उडी मारली. महिलेला वाचवण्‍यात आले. मात्र यवेळी आशिष यांचा मृत्‍यू झाला. या घटनेची चौकशी करण्‍याची मागणी आशिषच्‍या कुटुंबियांनी केली आहे तर पोलिसांनी पार्टीतील सर्व अधिकारी नशेत असल्‍याचा संशय व्‍यक्‍त केला आहे.

आशिषला पोहता येत होते
-  ट्रेनिंगच्‍या शेवटच्‍या दिवशी सर्व्हिस इन्‍स्‍टीट्युटमधील सर्व आयएएस, आयएफएस आणि आयआरएस अधिकारी दिल्‍लीमध्‍ये पुल साईड पार्टीचा आनंद घेत होते.
- पार्टीमध्‍ये पोहण्‍याची एक अॅक्टिव्‍हीटी होती. याचवेळी एक महिला पाय घसरुन स्विमिंग पुलमध्‍ये पडली. तिला वाचवण्‍यासाठी आशिषसह काहीजणांनी स्विमिंग पुलमध्‍ये उडी मारली. महिलेला वाचवण्‍यात आले. मात्र आशिष नंतर कुठेही दिसले नाही. थोड्या वेळाने सर्वांना स्विमिंग पुलमध्‍ये त्‍यांचा मृतदेह तरंगताना दिसला.
- यानंतर आशिषच्‍या मित्रांनी त्‍यांना ताबडतोब रुग्‍णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्‍टरांनी तपासून त्‍यांना मृत घोषित केले.
- आशिष हरियाणातील सेनापती येथील रहिवासी आहे. त्‍यांच्‍या कुटुंबियांनी या घटनेमागे घातपाताचा संशय व्‍यक्‍त केला आहे व चौकशीची मागणी केली आहे. आशिषला चांगले पोहता येत होते, असे त्‍याच्‍या कुटुंबियांनी सांगितले आहे.

हिमाचलमध्‍ये पोलिस उप-महाधिक्षक (DSP) होते आशिष
- 2015 मध्‍ये 'आयएएस'साठी निवड होण्‍यापूर्वी आशिष हिमाचल प्रदेशमध्‍ये पोलिस उप-माधिक्षकपदी रुजू होते.
- आयएएसमध्‍ये निवड झाल्‍यानंतर विदेश सेवा IFS मध्‍ये काम करण्‍याची आशिष यांची इच्‍छा होती. त्‍याची परीक्षाही ते उत्‍तीर्ण झाले होते.
- काही वर्षांपूर्वीच एका डॉक्‍टर युवतीशी त्‍यांचा विवाह झाला होता.
 
काय म्‍हणाले पोलिस?  
- प्राथमिक तपासात आशिषचा मृत्‍यू बुडून झाल्‍याचे वाटत आहे, अशी माहिती दिल्‍लीचे पोलिस उप-महाधिक्षक ईश्‍वर सिंह यांनी दिली आहे.
- पोस्‍टमॉर्टम रिपोटनंतर चित्र स्‍पष्‍ट होईल. सध्‍या आम्‍ही आशिषच्‍या मित्रांकडून अधिक माहिती मिळवत आहोत, असे पोलिसांनी सांगितले.    

 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...