आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • IB Issued Fresh Alert Over The Suspected Jihadi Links Of The Youngest Nirbhaya Rapist

\'निर्भया\'प्रकरणातील अल्पवयीन रेपिस्ट दहशतवाद्यांच्या संपर्कात?, IB चा अलर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- चार वर्षांपूर्वी म्हणजेच 16 डिसेंबर 2012 च्या रात्री दिल्लीत संपूर्ण देशाला हादरुन टाकणार घटना घडली हो्ती. धावत्या बसमध्ये एका पॅरामेडिकलच्या विद्यार्थिनीवर सामुहीक बलात्कार झाला होता. नंतर तिला व तिच्या मित्राला धावत्या बसमधून खाली फेकून देण्यात आले होते. या प्रकरणातील किशोरवयीन आरोपी दहशतवाद्यांच्या संपर्कात असण्याची शक्यता इंटेलिजन्स ब्यरोने (IB) व्यक्त केली आहे. IB च्या अलर्टनंतर सुरक्षा एजन्सी त्याच्या प्रत्येक हलचालीवर लक्ष ठेवून आहे.

दरम्यान, 2011मध्‍ये झालेल्‍या बॉम्‍बस्‍फोटातील आरोपी आणि निर्भया बलात्‍कार प्रकरणातील आरोपींना बालसुधागृहातील एकाच खोलीमध्‍ये ठेवले होते. गुन्‍हा केला तेव्‍हा हे दोघेही अल्‍पवयीन होते. यापैकी बॉम्‍बस्‍फोटातील आरोपी हा बलात्‍कारातील आरोपीचा ब्रेश वॉश करून त्‍याला 'जिहादी' बनवण्‍याचा प्रयत्‍न करत असल्‍याचे प्रकार उघड झाला होता. त्‍यामुळे आता या दोघांना वेगवेळ्या खोलीत ठेवण्यात आले होते. एकमेकांची भेट घेण्‍यास दोघांना बंदी घालण्‍यात आली आहे.

काय आहे प्रकरण...?
- निर्भया बलात्कार व हत्या प्रकरणातील किशोरवयीन दोषीला 15 डिसेंबरला मुक्त करण्‍यात आले.
- एका मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशातील बदायूमध्ये राहाणार्‍या या मुलाबाबत IB ने राज्य सरकारला अलर्ट पाठवला आहे.
- तो दहशतवादी कारवायांकडे ओढला जाण्याची शक्यता आहे, असे IB ने अलर्टमध्ये स्पष्ट केले आहे. यामुळे सरकार व पोलिस यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत.
- दुसरीकडे, त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार उपाय शोधत आहे. त्या अनुषंगाने त्याचे समुपदेशन केले जात आहे.

बाल सुधारगृहात होता काश्मिरी मुलांच्या संपर्कात...
- बाल सुधारगृहात असताना आरोपी काश्मिरी मुलांच्या संपर्कात होता. तेथे त्यांनी त्याचे ब्रेन वॉशिंग केले व त्याला जिहादमध्ये सामील होण्यासाठी प्रेरित केल्यामुळे बाहेर आल्यानंतर तो दहशतवादी कारवायांत ओढला जाण्याची शक्यता तेव्हाच वर्तवण्यात आली होती.
- या आरोपीला सुरुवातीला दिल्लीतील किंग्जवे कॅम्पमधील बालसुधारगृहात ठेवले होते. त्यानंतर दोन-तीन महिन्यांनी त्याला कोणतेही कारण न देता दुसऱ्या बालगृहात हलवण्यात आले.
- तेथे त्याची ओळख काश्मिरी अल्पवयीन आरोपीशी झाली; परंतु हा आरोपी त्याच्या प्रभावाखाली जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला त्याच्यापासून वेगळे ठेवून त्याचे समुपदेशन करण्यात आले.

पुढील स्लाइडवर वाचा, काय आहे निर्भयाप्रकरण? काय घडले होते धावत्या बसमध्ये?
बातम्या आणखी आहेत...