आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या विजयाला षडयंत्र म्हणणार्‍या ICC प्रेसिडेंटचा राजीनामा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे (आयसीसी) चे प्रेसिडेंट मुस्तफा कमाल यांनी बुधवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. कमाल यांनी वर्ल्‍डकपमध्ये बांगलादेशाचा झालेला पराभव हा भारतीय संघाने षडयंत्र रचून मिळविलेला विजय म्हटले होते.
वर्ल्डकप क्वार्टर फायनलमध्ये बांगलादेशला टीम इंडियाने पराभूत केले होते. त्यानंतर कमाल यांनी पंचाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यासोबतच आयसीसी भारताला विजयासाठी मदत करत असल्याचा कागांवा त्यांनी केला होता. आयसीसी चेअरमन एन. श्रीनिवासन यांनी विजेत्या संघाला वर्ल्डकप ट्रॉफी दिली होती, नियमानुसार आयसीसी प्रेसिडेंट ट्रॉफी देतात. त्यामुळे मुस्तफा नाराज झाले होते. त्यांनी याविरोधात आयसीसीविरोधात खटला दाखल करण्याचा विचारही बोलून दाखवला आहे.
ट्रॉफी देणे हा माझा संवैधानिक अधिकार
कमाल म्हणाले, "रविवारी वर्ल्डकप फायनल सामन्यानंतर विजेत्या संघाला ट्रॉफी देण्याचा अधिकार माझा होता. माझा हा अधिकार हिसकावण्यात आला.'

मुस्तफा यांनी आयसीसीमध्ये सुरू असलेला गोंधळ जगजाहीर करण्याची धमकी देताना म्हटले की, ट्रॉफी देणे हा माझा संवैधानिक अधिकार आहे. मात्र, दुर्दैवाने मला असे करण्यापासून रोखण्यात आले. यामुळे माझा आणि माझ्या अधिकाराचा अवमान झाला आहे.
काय होता वाद ?
विश्वचषकाच्या क्वार्टर फायनल सामन्यात भारताकडून झालेल्या पराभवाने बांगलादेशमध्ये खळबळ माजली आहे. आयसीसीचे प्रेसिडेंट आणि बांगलादेश सरकारमधील मंत्री मुस्तफा कमाल यांनी भारताला जिंकवण्यासाठी कट रचण्यात आल्याचा आरोप केला.
अंपायर्सनी दिलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे शंका निर्माण झाल्याची ते म्हणाले. कमाल म्हणाले की, भारताच्या बाजुने 12 निर्णय देण्यात आले. मेलबर्न ग्राऊंडवर लावलेल्या स्क्रीनवर 'जितेगा इंडिया' असे संदेश दाखवण्यात येत होते, असेही ते म्हणाले. त्यांच्या मते स्क्रीन ICC च्या अधिकार क्षेत्रांत येत असते. गुरुवारी झालेल्या पराभवानंतर बांगलादेशचे फॅन्स रस्त्यावर उतरले होते. त्यांनी आयसीसी आणि अंपायर आलीम दार यांचे पुतळेही जाळले. आयसीसीचे चेअरमन भारताचे श्रीनिवासन हे आहेत. त्यांचे पद कमाल यांच्यापेक्षा वरचे आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, श्रीनिवासन यांनी दिली ट्रॉफी